जैन इरिगेशन, जळगाव येथील अभ्यास दौरा यशस्वी

मुजीब खान कन्नड( प्रतिनिधी) : दि. ०८/०१/२०२४ रोजी युनूस फजलानी युनानी महाविद्यालय कुंजखेडा मार्फत द्वितीय वर्ष बी यू म स विद्यार्थ्यांसाठी जैन इरिगेशन, ग्रीन टेकडी जळगाव येथे अभ्यास दौऱ्यांचे आयोजन करण्यात आले होते. संस्थेचे अध्यक्ष फारूक रंदेरा व प्राचार्य सय्यद ईसार अहमद यांच्या उपस्थित दि. ८/१/२०२५ रोजी युनूस फजलानी युनानी महाविद्यालयाच्या विद्यार्थाना जैन इरिगेशन, जळगाव येथे भेट देण्यासाठी संस्थेच्या बस द्वारे निरोप देण्यात आले. महाविद्यालयाच्या विद्यार्थांनी जैन इरिगेशन, ग्रीन टेकडी, जळगाव येथे भेट देऊन विद्यार्थांनी विविध औषधी वनस्पती बाबत माहिती जाणून घेतली. जेणेकरून विद्यार्थाना येणाऱ्या काळात अभयासक्रमा मध्ये त्याचा फायदा होईल. विद्यार्थासोबत इलमुल अदविया या विभागाचे विभाग प्रमुख डॉ. शोएब शाह, डॉ. मलिक तौहीद डॉ. वैश अहमद डॉ. तहसीना परवीन, डॉ. अब्दुल रहमान. या शिक्षकांनी अभ्यास दौरा यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.

Jan 10, 2025 - 21:50
Jan 10, 2025 - 21:51
 0
जैन इरिगेशन, जळगाव येथील अभ्यास दौरा यशस्वी
1 / 1

1. जैन इरिगेशन, जळगाव येथील अभ्यास दौरा यशस्वी

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow