मनपा प्रियदर्शनीच्या ३५० विद्यार्थ्यांनी लुटला थ्रीडी पिक्चरचा आनंद

मनपा प्रियदर्शनीच्या ३५० विद्यार्थ्यांनी लुटला थ्रीडी पिक्चरचा आनंद माहिती व जनसंपर्क विभाग दि.१० जानेवारी छत्रपती संभाजी नगर महानगरपालिकेच्या प्रियदर्शनी शाळेच्या बालवाडी ते दहावीच्या ३५० विद्यार्थ्यानी पहिल्यांदाच थ्रीडी पिक्चरचा आनंद लुटला. मा.आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत व उप आयुक्त तथा शिक्षण विभाग प्रमुख अंकुश पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली मनपा शाळेतील विद्यार्थ्यांसाठी सतत नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येत आहेत.यात शहरातील सेवाभावी संस्थांचा सहभाग नेहमी असतो. आज लायन्स क्लब टायटनच्या वतीने प्रियदर्शनी विद्यालयाचे विद्यार्थ्यांनी रिलायन्स मॉल येथील आयनॉक्स थिएटर मध्ये मुफासा या थ्रीडी पिक्चर चा आनंद घेतला. शहरातील लायन्स क्लब ऑफ टायटन्स या समाजसेवी संस्थेने विद्यार्थ्यांसाठी रिलायन्स मॉल येथील आयनॉक्स थिएटरमध्ये मुफासा द लायन किंग या थ्रीडी चित्रपटाचे स्पेशल स्क्रीनिंगचे आयोजन केले होते.हा चित्रपट मोफत दाखविण्यात आला. याप्रसंगी उपायुक्त तथा शिक्षण विभाग प्रमुख अंकुश पांढरे, शिक्षण समन्वयक गणेश दांडगे, मुख्याध्यापक संजीव सोनार, सीबीएसई समन्वयक शशिकांत उबाळे. हे उपस्थित होते. या प्रकल्प आयोजनासाठी ला. कुणाल बाकलीवाल, माजी अध्यक्ष ला कपिल बाकलीवाल अध्यक्ष ला.ऋत्विक अग्रवाल, सचिव ला.सागर भानुशाली, कोषाध्यक्ष ला. पलाश जैन, प्रकल्प समन्वयक ला. मयूर कासलीवाल व वरद लाहोटी, तसेच लायन्स क्लब चे इतर पदाधिकारी, आदित्य कासलीवाल, सौरभ खिवंसरा, रोहित गंगवाल, तरण संचेती, हर्षवर्धन शाही, अजय पापडीवाल,कल्पेश क्षीरसागर, वीरेंद्र वर्मा, दीपेश जांगडे, रोहन मुगदिया यांनी परिश्रम घेतले या ठिकाणी विद्यार्थ्यांना चित्रपटाच्या मध्यन्तरा मध्ये डोमिनोज पिझ्झा तसेच ज्यूस ची पाकिटे देण्यात आली. बालवाडी ते दहावी अशा एकूण साडेतीनशे विद्यार्थ्यांना ही मेजवानी देण्यात आली. शाळेतील काही विद्यार्थ्यांनी प्रथमच थ्रीडी चित्रपट पाहिल्याचे सांगितले त्यासोबत एस्केलेटर वर पण पहिल्यांदा चढल्याचे सांगितले. एस्केलेटर वर चढताना अनेकांना गंमत वाटत होती. काहींनी तर हा मॉल पहिल्यांदाच पाहिला असे आनंदाने व्यक्त केले. बऱ्याच विद्यार्थ्यांनी आतापर्यंत पिझ्झा खाल्लेलाच नव्हता. असे सांगितले. थ्रीडी चित्रपट पाहताना ज्यावेळेस काही चित्रे किंवा प्राणी अंगावर येतात त्यावेळेस विद्यार्थी घाबरून ओरडत होते किंवा आनंदाने ओरडत होते. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून लायन्स क्लबचे सर्व पदाधिकारी भारावून गेले होते. याप्रसंगी उपायुक्त अंकुश पांढरे यांनी लायन्स क्लबच्या पदाधिकाऱ्यांना अशा नाविन्यपूर्ण प्रकल्पाबद्दल शुभेच्छा दिल्या.

Jan 11, 2025 - 14:44
 0
1 / 1

1.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow

Er.M.A. Shakeel Senior Journalist,Social and Political activist Sportsman,Singer.District VicePresident Human Right Council of India.