हॉटेल्स परवान्याची तपासणी कधी ?

मुजीब खान कन्नड( प्रतिनिधी) : जिभेचे लाड पुरवण्यासाठी हॉटेल्स मध्ये जाणाऱ्या खव्यांना ते किती अस्वच्छ आहे याचा अंदाज येत नाही अन्नसुरक्षा मानक कायद्याचे तंतोतंत पालन कोणतेच हॉटेल्स करीत नाही शहरातील बहुतांश हॉटेल्सला अन्न व औषधी प्रशासन विभागाची परवानगी नसून कायद्याचे उल्लंघन करून बेधडकपणे सुरू आहेत ? हॉटेल्स मधील कर्मचाऱ्यांची वेळोवेळी आरोग्य तपासणी करण्यात येते का ? अन्नपदार्थ ठेवण्याची जागा स्वच्छ आहे का ? शुद्ध पाण्याचा पुरवठा होतो का ? यांसह अस्वच्छतेवर बोट ठेवता येईल असे अनेक प्रश्न एरणीवर आले आहेत परवाने नसलेल्या हॉटेल्स वर कारवाई कारवाई करण्यात यावी अन्न प्रशासन विभाग हॉटेलची तपासणी करीत नाही वर्षभरात किती हॉटेलची तपासणी केली ? हॉटेल चालकावर कारवाई कुणी करावी याबाबत अन्न व औषध विभाग आणि नगरपालिकेच्या आरोग्य विभागामध्ये मतभेद आहेत त्याशिवाय रस्त्याच्या कडे वडापाव विकणारे किंवा चहा टपरीवाल्यांकडूनही आरोग्य विषयक नियमांचे सर्रास उल्लंघन होत असल्याचे दिसून येते पिशोर नाक्यावर चक्क एक हॉटेल्स मालक सकाळच्या नाश्त्यासाठी आपल्या हॉटेल्सच्या बाहेरच उभ्या राहून नाश्ता करा हॉटेल्स मध्ये पुष्कळ जागा असून आत मधी बसू देत नाही अनेकांकडे परवानेच नाही काही ठिकाणी भोजनालयाची रांग आहे सर्वोच्च हॉटेल भोजनालयात स्वच्छतेचा अभाव आहे येथील कर्मचाऱ्यांची कधीच आरोग्य तपासणी केली जात नाही कारवाई होत नसल्यामुळे सामान्य नागरिकांच्या आरोग्यबाबत कुणीही गंभीर नसल्याचा प्रश्न या निमित्त पुढे आला आहे अन्न प्रशासन विभागातर्फे भेजोयुक्त पदार्थ आणि स्वच्छतेचे निकष न पाळण्यावर दिवाळीतच कारवाई केली जाते आणि अन्य दिवसात कारवाई न करण्यासाठी अपुऱ्या कर्मचाऱ्यांचे कारण पुढे केले जाते

Jan 4, 2025 - 22:50
Jan 4, 2025 - 22:51
 0
हॉटेल्स परवान्याची तपासणी कधी ?
1 / 1

1. हॉटेल्स परवान्याची तपासणी कधी ?

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow