स्मोकिंग बनले तरुणाईचे स्टाईल स्टेटस
स्मोकिंग बनले तरुणाईचे स्टाईल स्टेटस मुजीब खान कन्नड (प्रतिनिधी). : आजचा तरुण वर्ग उच्च शिक्षण घेण्यात नेहमीच एक पाऊल पुढे असतो मात्र त्याच बरोबर अनेक प्रकारचे व्यसन त्यांना या वयात जडलेले आहे परंतु व्यसन फक्त मध्यवर्गी किंवा गरीब मुलेच करत नसून यात लाडवलेल्या बापाची मुले ही स्मोकिंग करतात यामध्ये असे जाणवते की या दोन्ही वर्गातील मुलांपेक्षा उच्चवर्गीय मुले जास्त स्मोकिंग करतात नवीन तंत्रज्ञानाला पुढे नेण्यासाठी आज इंजिनिअरिंगचे विद्यार्थी धडपडत आहे तेही आज स्मोकिंग चे बडी ठरत आहे तसेच लोकांना आजार पासून दूर ठेवण्यासाठी डॉक्टर नेहमी पुढे असतात परंतु त्याच स्मोकिंग च्या धुरात भावी डॉक्टर वाहून जात आहे अनेक प्रकारचे उच्च शिक्षण घेणारे विद्यार्थी या व्यसनाला आज मोठ्या प्रमाणात बळी पडत आहेत काही तरुण फक्त सुरुवातीला छंद म्हणून स्मोकिंग करतात पण हळूहळू तोच छंद त्यांची सवय बनवून जातो काही तर फक्त स्टाईल स्मोकिंग करतात व्यसनासाठी पाणी स्टॉलवर तरुणांचे यासाठी अनेक उच्च दर्जाचे ब्रँडची मोठ्या प्रमाणात विक्री होते मध्यमवर्गामध्ये वापरली जाणारी इंटरनॅशनल ब्रँड आहेत ज्या फक्त प्रोफेशनल आणि ज्या तरुणांना खरेदी करणे शक्य आहे असेच ती सेवन करू शकतात असा अनेक ब्रँडचा वापर आज सर्रासपणे होत आहे एवढ्या प्रमाणात उच्च दर्जाचे शिक्षण घेत असताना देखील तरुण स्मोकिंगला का बळी जात आहे याचे कोणतेही बरोबर निशाने लागत नाही असे कशामुळे घडते तर अनेक तरुणांचे त्यावर मत आहे की स्मोकिंग केल्याने टेन्शन कमी होते तर काही म्हणतात फक्त फॅशन म्हणून टाईमपास करायला छान वाटते आणि काही तरुण घरचे प्रेमभंगाचे अभ्यासाचे टेन्शन दूर करण्यासाठी स्मोकिंग करतात असा हा उच्च शिक्षण घेणारा तरुण वर्ग आज स्मोकिंगच्या धुराच्या अंधारात हरवलेला आहे ज्याला आज प्रकाशाकडे आणण्याची गरज आहे

1. स्मोकिंग बनले तरुणाईचे स्टाईल स्टेटस
What's Your Reaction?






