वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या चारचाकी व दोन चाकी वाहनांची जप्ती कारवाई
वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या चारचाकी व दोन चाकी वाहनांची जप्ती कारवाई छत्रपती संभाजी (औरंगाबाद )दि १ जानेवारी (प्रतिनिधि) छत्रपती संभाजी नगर महानगरपालिका आणि शहर वाहतूक पोलिस यांच्या संयुक्त कारवाई ने शहरातील गजबजलेल्या भागातून रहदारीस अडथळा निर्माण करणाऱ्या चारचाकी वाहनांची जप्ती कारवाई करण्यात येत आहे. रोषण गेट ते आझाद चौक व कटकट गेट ते एस.पी बंगला व चिस्तिया चौक ते सेंट्रल नाका या रस्त्यावरील दुभाजकाला खेटून वाहतुकीस अडथळा निर्माण होईल असे चारचाकी व तीन चाकी व रस्त्यावर बेशिस्त पणे दुचाकी वाहने उभे करण्यात आले होते.मां.आयुक्त महोदय यांच्या आदेशानुसार दि.२७ डिसेंबर ते ३१ डिसेंबर या कालावधीत सदर वाहने जप्त करण्याची कारवाई करण्यात आली आहे. सदर कारवाई मां.आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या आदेशानुसार व अतिरिक्त आयुक्त तथा अतिक्रमण विभाग प्रमुख संतोष वाहुळे यांच्या मार्गदर्शनाखाली महानगरपालिकेच्या माजी सैनिक पथक प्रमुख प्रमोद जाधव यांच्या नेतृत्वात माजी सैनिक वॉर्डन पथक व शहर वाहतूक पोलिस यांच्या संयुक्त पथकाने दि.२७ डिसेंबर ते ३१ डिसेंबर या कालावधीत एकूण चार चाकी , तीन चाकी ९३ वाहने व दोन चाकी १९७ वाहने जप्त करून गरवारे क्रीडा संकुल येथे जमा करण्यात आले आहेत.या जप्त केलेल्या वाहन धारकांवर एकूण ०३ लाख ७३ हजार रुपये दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. सदरील कारवाई या पुढेही या प्रकारे सुरू राहणार असून ज्या नागरिकांनी रहदारीस अडथळा निर्माण होईल असे वाहने रस्त्यावर उभे केले असतील अशी वाहने तत्काळ काढून घ्यावी अन्यथा मनपा प्रशासन वाहने जप्त करताना जर काही नुकसान झाले तर त्यास जबाबदार राहणार नाही.सदर कारवाई प्रशासनाच्या वतीने निःपक्ष पणें करण्यात येत आहे.तसेच कारवाई दरम्यान नागरिकांनी अडथळा निर्माण केल्यास त्यांच्यावर तत्काळ गुन्हे दाखल करण्यात येईल असे प्रशासनाच्या वतीने कळविण्यात आले आहे.

1.
What's Your Reaction?






