युवकांनी प्रधानमंत्री इंटर्नशिप योजनेतंर्गत सहभाग नोंदविण्याचे आवाहन
युवकांनी प्रधानमंत्री इंटर्नशिप योजनेतंर्गत सहभाग नोंदविण्याचे आवाहन छत्रपती संभाजीनगर,दि.13 :- भारत सरकारच्या मिनिस्ट्री ऑफ कॉरपोरेट अफेअर्स अंतर्गत प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना सुरू करण्यात आलेली आहे. या इंटर्नशिप योजनेसाठी 21 ते 24 वयोगटातील पुर्णवेळ शिक्षण, कौशल्य किंवा नोकरीत नसलेल्या भारतीय युवा वर्ग पात्र आहे. या योजनेअंतर्गत भारतातील नामांकित कंपन्यांमध्ये युवकांना 12 महिन्यांचे प्रशिक्षण (इंटर्नशिप) दिले जाणार आहे. प्रशिक्षणार्थ्यांना दरमहा रू.5000/- आर्थिक सहायता व एकरकमी सहायता रू.6000/- देण्यात येणार आहे. तसेच प्रत्येक प्रशिक्षणार्थ्यांस प्रधानमंत्री जीवनज्योती विमा योजना व प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेअंतर्गत विमा संरक्षण दिले जाणार आहे. 1 कोटी भारतीय युवा वर्गाला प्रशिक्षण (इंटर्नशिप) देण्याचे भारत सरकारचे उद्दिष्ट आहे. या इंटर्नशिप योजनेअंतर्गत सहभाग नोंदविण्यासाठी http://pminternship.mca.gov.in या वेबसाईटवरील Register Now या टॅबवर क्लिक करून उमेदवारांनी नोंदणी करणे आवश्यक आहे. नोंदणी करण्यासाठी उमेदवारांच्या आधार क्रमांकास मोबाईल क्रमांक लिंक असणे आवश्यक असून आधार लिंक मोबाईल क्रमांकावर ओटीपी पाठविण्यात येतो. त्यानंतरच उमेदवारांची नोंदणी होवू शकते. अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक 30 मार्च, 2025 असा आहे. जिल्ह्यातील 21 ते 24 वयोगटातील जास्तीत जास्त पात्र युवक-युवतींनी प्रधानमंत्री इंटर्नशिप योजनेअंतर्गत नोंदणी करून प्रशिक्षणाची संधी उपलब्ध करून घ्यावी व अधिक माहितीसाठी आपल्या जिल्ह्यातील जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, या कार्यालयास भेट द्यावी, असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, विभागीय आयुक्तालयाच्या उपआयुक्त विद्या शितोळे यांनी प्रसिद्धीपत्रद्वारे केले आहे.

1.
What's Your Reaction?






