मार्टी कृती समितीची प्रजासत्ताक दिना निमित्त अल्पसंख्यांक आयुक्तालय हज हाउस येथे ध्वजरोहन संपन्न आयुक्तांना भेट

मार्टी कृती समिती, महाराष्ट्र महाराष्ट्र राज्य ८१४९१४३९१९ मार्टी कृती समितीची प्रजासत्ताक दिना निमित्त अल्पसंख्यांक आयुक्तालय हज हाउस येथे ध्वजरोहन संपन्न आयुक्तांना भेट आम्हाला कळवण्यास आनंद होत आहे की, दिनांक २६ जानेवारी रोजी मार्टी कृती समिती महाराष्ट्र राज्याच्या वतीने अल्पसंख्यांक आयुक्त मा. श्रीमती विशाखा आढाव यांची भेट घेऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. या भेटीवेळी "मार्टी"च्या अंमलबजावणीसह विविध सामाजिक प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. मार्टी कृती समिती महाराष्ट्र राज्याच्या वतीने आज पदभार स्वीकारलेल्या अल्पसंख्यांक आयुक्त मा. श्रीमती विशाखा आढाव यांची भेट घेऊन सत्कार करण्यात आला. यावेळी "मार्टी"च्या अंमलबजावणीसह विविध सामाजिक प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. समितीचे अध्यक्ष श्री. अजहर पठाण यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून पुढील १०० दिवसांचा आराखडा तयार करण्यासह अल्पसंख्यांक समाजातील विद्यार्थ्यांसाठी ठोस शिक्षण, कौशल्यविकास, आणि रोजगार संधी निर्माण करण्यासाठी "मार्टी" संस्थेद्वारे विविध उपक्रम राबविण्याची विनंती केली. सारथी, बार्टी, आणि महाज्योती यांसारख्या संस्थांच्या माध्यमातून समाजातील विद्यार्थ्यांना नोकरी, रोजगार, व फेलोशिप मिळवण्यात यश आले आहे. मार्टी संस्थेची स्थापना आणि पुढील योजना: अल्पसंख्याक संशोधन व प्रशिक्षण संस्था (मार्टी) स्थापन करण्यासाठी शासनाने मान्यता दिली असून, शासन परिपत्रक जारी करण्यात आले आहे. आयुक्त मा. श्रीमती आढाव यांनी उच्चस्तरीय सचिव समितीमार्फत 'मार्टी' कार्यालयासाठी ११ पदांची निर्मिती प्रक्रिया सुरू असल्याची माहिती दिली. तसेच, अल्पसंख्यांक आयुक्तालयातील ३६ जागा आणि जिल्हास्तरावरील ८६ जागा लवकरच भरल्या जातील. यामुळे अल्पसंख्यांक समाजाला सर्व योजनांचा प्रभावी लाभ मिळेल. मार्टीच्या आस्थापनेवरील नव्या पदांसाठी रु. ६.२५ कोटी इतकी अर्थसंकल्पीय तरतूद करण्यात आली आहे. नवे लेखाशिर्ष व कार्यालय स्थापन करण्याची प्रक्रिया: छत्रपती संभाजीनगर येथे मार्टीचे मुख्यालय स्थापन करण्याचे नियोजन असून, संचालक पद वगळता इतर १० पदांना मान्यता मिळविण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. नव्या लेखाशिर्ष निर्माण करण्याचे काम देखील विभागामार्फत सुरू आहे. उपस्थित मान्यवर: या प्रसंगी समितीचे उपाध्यक्ष सर आसेफ, अभ्यास समिती सदस्य सरताज खान, मतीन पटेल, अश्फाक अहमद, कक्ष अधिकारी श्री. अंधारे, जिल्हा व्यवस्थापक श्री. जहीर शेख, कनिष्ठ लिपिक श्री. जुबेर, शहीद सुलतान, समीर, आणि वक्फ बोर्डाचे जनसंपर्क अधिकारी श्री. अश्फाक उपस्थित होते. आपल्या लोकप्रिय दैनिकातून या महत्त्वाच्या बातमीला प्रसिद्धी देऊन समाजाच्या हितासाठी होणाऱ्या उपक्रमांची माहिती पोहोचवावी, अशी विनंती आहे. आपण या बातमीसाठी फोटो किंवा अधिक माहिती आवश्यक असल्यास कृपया संपर्क साधावा. आपल्या सहकार्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद!

Jan 26, 2025 - 18:51
Jan 26, 2025 - 18:51
 0
मार्टी कृती समितीची प्रजासत्ताक दिना निमित्त अल्पसंख्यांक आयुक्तालय हज हाउस  येथे ध्वजरोहन संपन्न  आयुक्तांना भेट
1 / 2

1. मार्टी कृती समितीची प्रजासत्ताक दिना निमित्त अल्पसंख्यांक आयुक्तालय हज हाउस येथे ध्वजरोहन संपन्न आयुक्तांना भेट

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow