प्रयागराजच्या महाकुंभ मेळ्यात भीषण अग्नितांडव
प्रयागराजच्या महाकुंभ मेळ्यात भीषण अग्नितांडव प्रयागराजमधून मोठी बातमी समोर येत आहे. महाकुंभ मेळ्यात भीषण आग लागली आहे. अग्निशमन दलाला पाचारन करण्यात आलं असून, आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे घटनेबाबत अधिक माहिती अशी की प्रयागराजमध्ये महाकुंभ मेळावा सुरू आहे. महाकुंभ मेळ्याच्या सेक्टर पाचमध्ये ही भीषण आग लागली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार एका तंबूमध्ये ठेवलेल्या सिलिंडरचा स्फोट झाला. त्यानंतर ही भीषण आग लागली आहे. या आगीत आतापर्यंत 20 ते 25 तंबू जळून खाक झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच तातडीनं अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून, सहा गाड्यांच्या मदतीनं आगीवर नियंत्रण मिळवण्यात येत आहे. एनडीआरएफ आणि पोलीस दलाचं पथक देखील घटनास्थळी दाखल झालं असून, ज्या ठिकाणी आग लागली आहे, तेथील सर्व परिसर खाली करण्यात आला आहे. नागरिकांना सुरक्षितस्थळी हालवण्यात आलं आहे.

1.
What's Your Reaction?






