मागासवर्गीय समाजाला भूमिहीन करण्याच्या जातीय मानसिकतेतून सौर ऊर्जा प्रकल्प थांबविण्याची मागणी

मागासवर्गीय समाजाला भूमिहीन करण्याच्या जातीय मानसिकतेतून सौर ऊर्जा प्रकल्प थांबविण्याची मागणी
फुलंब्री तालुक्यातील पाल येथील गायरान जमीन गट क्रमांक १३७ मध्ये मागासवर्गीय समाजाच्या सुमारे ८० ते १०० कुटुंबे पिढ्यान्पिढ्या शेती करून उदरनिर्वाह करत आहेत. मात्र, या कुटुंबांना सातबारा मिळालेला नसून, त्यांची मालकी हक्काची नोंद गाव नमुना १ मध्ये तलाठी आणि तहसिल कार्यालयात आहे.
ग्रामपंचायत पाल यांनी खाजगी कंपनीला सौर ऊर्जेच्या प्रकल्पासाठी नाहरकत प्रमाणपत्र दिले असून, या प्रकल्पाच्या नावाखाली मागासवर्गीय समाजाला पोलिस बळाचा वापर करून बेघर करण्याचा प्रयत्न होत आहे. यामुळे गावातील वातावरण तणावपूर्ण झाले आहे.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आरपीआय) चे तालुकाध्यक्ष राजू प्रधान यांनी तहसीलदार डॉ. कृष्णा कानगुले यांची भेट घेऊन हा प्रकल्प इतरत्र हलविण्याची मागणी केली आहे. तसेच, राज्य कार्याध्यक्ष बाबुराव कदम व मराठवाडा अध्यक्ष मिलिंद शेळके यांनीही प्रशासनाकडे याबाबत हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे.
आरपीआयच्या कार्यकर्त्यांनी प्रशासनाला विनंती केली आहे की, सदर प्रकल्पामुळे शेकडो कुटुंबांचा उदरनिर्वाह धोक्यात येईल. त्यामुळे हा प्रकल्प त्वरित थांबविण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
यावेळी सुखदेव नरवडे, मधुकर तुपे, अरुण पगारे, कडूबा तुपे, शेषराव नरवडे,लक्ष्मण शिरसाठ,काशीनाथ नरवडे,महादेव नरवडे, संदीप तुपे आदि उपस्थित होते.
What's Your Reaction?






