मनपा अधिकारी कर्मचारी यांचे वेतन हजेरी ॲप नुसारच होणार
मनपा अधिकारी कर्मचारी यांचे वेतन हजेरी ॲप नुसारच होणार छत्रपती संभाजी नगर महानगरपालिकेच्या अधिकारी कर्मचारी यांना कार्यालयीन शिस्त लावण्यासाठी आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या आदेशानुसार महानगरपालिकेच्या वतीने हजेरी ॲप तयार करण्यात आले आहे. दिनांक 01 जानेवारी पासून सुरू झालेले या ॲप वर दररोज तीन वेळेस हजेरी नोंदवायची आहे.ॲप वर नोंद केलेल्या हजेरी नुसारच अधिकारी कर्मचारी यांचे या महिन्याचे व यापुढे ही याच प्रमाणे वेतन होणार आहे. त्याकरिता सर्वांनी याची गांभीर्याने नोंद घ्यावी व हजेरी ॲप वर आपली नियमित हजेरी नोंदवावी अन्यथा वेतन दिले जाणार नाही असे निर्देश मा.प्रशासक महोदय यांनी दिला आहे. दि.०१ जानेवारी पासून या हजेरी ॲप वर हजेरीची नोंद करणे सर्वांना बंधनकारक करण्यात आले होते.परंतु काही अधिकारी कर्मचारी अजूनही यास गांभीर्याने घेत नसल्याचे प्रशासक महोदय यांच्या निदर्शनास आले असता त्यांनी हा इशारा दिला आहे.

1.
What's Your Reaction?






