हर्सूल मनपा शाळेत तिसरे बालसाहित्य संमेलन संपन्न
हर्सूल मनपा शाळेत तिसरे बालसाहित्य संमेलन संपन्न औरंगाबाद दि.०९ मार्च (प्रतिनिध) "लिहण्याने आपली सर्जनशीलता वाढून सर्वागीण विकास होतो. मी कविता लिहिल्या मुळे अखिल भारतीय बाल साहित्य संमेलनात, आकाशवाणीवर, पथनाट्याद्वारे जिल्हाधिकारी यांचे द्वारे बक्षीस मिळविले. मी लिहिते राहिल्याने माझी प्रगती होत आहे. त्यामुळे आपण सर्व विद्यार्थ्यानी कायम लिहते रहावे ."असे प्रतिपादन ''तिसरे बालसाहित्य संमेलनाच्या" अध्यक्षा हर्सूल शाळेतील वर्ग आठवीची विद्यार्थिनी यशोदा खेत्रे हिने व्यक्त केले. जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने नारीशक्ती ही संकल्पना घेऊन म.न.पा. केंद्रीय प्राथमिक व माध्यमिक विद्यालय हर्सूल गाव येथे "तिसरे बाल साहित्य संमेलन " घेण्यात आले. मनपा आयुक्त तथा प्रशासक जी. श्रीकांत यांच्या प्रेरणेतून आणि उपायुक्त तथा शिक्षण विभागप्रमुख अंकुश पांढरे, सनियंत्रण अधिकारी गणेश दांडगे, शिक्षणाधिकारी भारत तिनगोटे, विस्तार अधिकारी रामनाथ थोरे, यांच्या मार्गदर्शनाखाली "स्मार्ट स्कूल टू बेस्ट स्कूल" या उपक्रमाअंतर्गत गुणवत्ता वाढीसाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहे. याच अनुषंगाने हर्सूल म.न.पा. शाळेत दरवर्षीप्रमाणे यावर्षी "तिसरे बालसाहित्य संमेलन " घेण्यात आले. शाळेत साहित्य संमेलन घेण्याचे हे तिसरे वर्ष आहे. केंद्रीय मुख्याध्यापक जगन्नाथ सपकाळ यांनी संमेलनाचे उद्घाटन केले. व विद्यार्थांना नवीन साहित्य लिहिण्यासाठी सर्व मदत पुरविण्याचे सांगितले. स्वागताधक्ष म्हणून संगीता सहाणे यांनी सर्वांचे स्वागत केले. यावेळी लक्ष्मण महालकर रमेश वाडेकर, हेमा वैष्णव, सविता बांबर्डे चंद्रकला बकले यांनी आपले विचार व्यक्त केले यावेळी यावेळी नारीशक्ती या विषयावर परिसंवाद घेण्यात आला. त्यानंतर वीर महिला यावर कथाकथन घेण्यात आले. त्यानंतर कवी संमेलन घेण्यात आहे. यात विद्यार्थ्यांनी एकापेक्षा एक सरस कविता सादर केल्या . इयत्ता दुसरीचे विद्यार्थी आयेशा शेख, संध्या तुपसमुंद्रे, परिनीती चव्हाण, श्रुतिका गायकवाड , इयत्ता तिसरीचे विद्यार्थी आरोही जाधव , शिवानी जगदाळे, पाचवीचे विद्यार्थी तन्वी माळी, आरोही जाधव, अविनाश वाघचौरे मुस्कान पटेल, सहावीचे विद्यार्थी सोनम कांबळे, फैज तांबोळी आठवीचे विद्यार्थी कोमल मिसाळ, सृष्टी गौतम आदी विद्यार्थ्यांनी परिसंवाद, कथाकथन, कविसंमेलनात सहभाग घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आर्यन राजगुरे आणि भावेश राठोड यांनी केले. आभार प्रदर्शन संजय कुलकर्णी यांनी केले. बाल साहित्य संमेलनासाठी लक्षण महालकर, अंकुश लाडके, संजय मोकळे,सुनील हिरेकर, रमेश वाडेकर,संजय कुलकर्णी, विशाल बाविस्कर, शिक्षिका मोटे ,वैष्णव , बांबर्डे मस्के , शेळके ,कन्नर , शिंदे,दांडगे ,चव्हाण , कीर्ती व शुभांगी खंडारे यांनी परिश्रम घेतले.

1.
What's Your Reaction?






