नियमांचे उल्लंघन करून उसाचे वाहतूक

नियमांचे उल्लंघन करून उसाचे वाहतूक मुजीब खान कन्नड : कन्नड तालुक्यात ऊस तोडणी हंगाम मोठ्या प्रमाणात सुरू आहे अनेक तालुका परिसरात ग्रामीण ऊस वाहतूक करण्यासाठी ट्रॅक्टरने ऊस वाहतूक केली जाते हे ट्रॅक्टर चालक वाहतूक नियमांचे पालन करत नसल्यामुळे हे ऊस वाहतूक प्रवासी आणि नागरिकांच्या जीवाशी खेळणारी ठरत आहे नियमांचे उल्लंघन करून उसाचे वाहतूक करणाऱ्या चालकांवर आरटीओने कारवाई करावी अशी मागणी नागरिकांमधून होत आहे जिल्ह्यात उसाचे क्षेत्र मोठे असल्याने अनेक महिने ऊसतोड सुरू असते परंतु ही ऊसतोड सुरू असताना जी वाहतूक केली जाते ती मोठी समस्या सध्या रस्त्यावरून चालणाऱ्या नागरिकांच्या जीवावर बेतताना दिसत आहे ऊस वाहतुकीसाठी अनेक नियम आहेत वजनाचेही लिमिट आहे परंतु ऊस वाहतूक करताना अनेक नियम धाब्यावर बसवले जात असल्याचे वास्तव चित्र आहे उसाचे वाहतूक करणे ट्रॅक्टर चालक वाहतूक नियमांचे पालन करत नसल्यामुळे ही ऊस वाहतूक प्रवासी आणि नागरिकांच्या जीवाशी ठरत आहे ट्रॅक्टर रिकामा असो अथवा उसाने भरलेला रस्ता अरुंद असला तरी रस्त्यावरून बाजूला व्हायचेच नाही मागून अथवा समोरून येणाऱ्या वाहनाने हवे तर थांबावे किंवा बाजू पट्टीवरून जावे असा प्रकार बहुतेक ट्रॅक्टर चालकांकडून होतो अनेक कारणानी उसाने भरलेले आणि रिकामे ट्रॅक्टर रस्त्याच्या कडेला कोठेही थांबलेले दिसतात या अशा जीव घेण्या वाहतुकीने अनेकांचे बळी देखील घेतले असल्याचे वास्तू आहे ट्रॅक्टरने वाहतूक करत असताना अनेक गोष्टीकडे दुर्लक्ष केले जाते रास्ता किती रुंदीचा इतरांनी वाहतूक कशी करावी हा देखील विचार हे करताना दिसत नाहीत अनेकदा ट्रॅक्टर थांबविण्यासाठी किंवा उभे असताना ते जागचे हलू नये यासाठी चाका खाली मोठे दगड लावून ठेवतात परंतु ते दगड नंतर पुन्हा रस्त्यातून हटवले जात नाहीत त्यामुळे रात्रीच्या वेळी इतर प्रवाशांना याचा त्रास सहन करावा लागतो

Jan 3, 2025 - 22:38
 0
नियमांचे उल्लंघन करून उसाचे वाहतूक
1 / 2

1. नियमांचे उल्लंघन करून उसाचे वाहतूक

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow