नियमांचे उल्लंघन करून उसाचे वाहतूक
नियमांचे उल्लंघन करून उसाचे वाहतूक मुजीब खान कन्नड : कन्नड तालुक्यात ऊस तोडणी हंगाम मोठ्या प्रमाणात सुरू आहे अनेक तालुका परिसरात ग्रामीण ऊस वाहतूक करण्यासाठी ट्रॅक्टरने ऊस वाहतूक केली जाते हे ट्रॅक्टर चालक वाहतूक नियमांचे पालन करत नसल्यामुळे हे ऊस वाहतूक प्रवासी आणि नागरिकांच्या जीवाशी खेळणारी ठरत आहे नियमांचे उल्लंघन करून उसाचे वाहतूक करणाऱ्या चालकांवर आरटीओने कारवाई करावी अशी मागणी नागरिकांमधून होत आहे जिल्ह्यात उसाचे क्षेत्र मोठे असल्याने अनेक महिने ऊसतोड सुरू असते परंतु ही ऊसतोड सुरू असताना जी वाहतूक केली जाते ती मोठी समस्या सध्या रस्त्यावरून चालणाऱ्या नागरिकांच्या जीवावर बेतताना दिसत आहे ऊस वाहतुकीसाठी अनेक नियम आहेत वजनाचेही लिमिट आहे परंतु ऊस वाहतूक करताना अनेक नियम धाब्यावर बसवले जात असल्याचे वास्तव चित्र आहे उसाचे वाहतूक करणे ट्रॅक्टर चालक वाहतूक नियमांचे पालन करत नसल्यामुळे ही ऊस वाहतूक प्रवासी आणि नागरिकांच्या जीवाशी ठरत आहे ट्रॅक्टर रिकामा असो अथवा उसाने भरलेला रस्ता अरुंद असला तरी रस्त्यावरून बाजूला व्हायचेच नाही मागून अथवा समोरून येणाऱ्या वाहनाने हवे तर थांबावे किंवा बाजू पट्टीवरून जावे असा प्रकार बहुतेक ट्रॅक्टर चालकांकडून होतो अनेक कारणानी उसाने भरलेले आणि रिकामे ट्रॅक्टर रस्त्याच्या कडेला कोठेही थांबलेले दिसतात या अशा जीव घेण्या वाहतुकीने अनेकांचे बळी देखील घेतले असल्याचे वास्तू आहे ट्रॅक्टरने वाहतूक करत असताना अनेक गोष्टीकडे दुर्लक्ष केले जाते रास्ता किती रुंदीचा इतरांनी वाहतूक कशी करावी हा देखील विचार हे करताना दिसत नाहीत अनेकदा ट्रॅक्टर थांबविण्यासाठी किंवा उभे असताना ते जागचे हलू नये यासाठी चाका खाली मोठे दगड लावून ठेवतात परंतु ते दगड नंतर पुन्हा रस्त्यातून हटवले जात नाहीत त्यामुळे रात्रीच्या वेळी इतर प्रवाशांना याचा त्रास सहन करावा लागतो

2. कन्नड पंचायत समितीतून सिंचन विहिरीची फाईल गहाळ. शेतकऱ्यांचा आरोप.
कन्नड पंचायत समितीतून सिंचन विहिरीची फाईल गहाळ. शेतकऱ्यांचा आरोप.
कन्नड पंचायत समितीचा सावळा गोंधळ पुन्हा एकदा चव्हाट्यावर..
मुजीब खान कन्नड
- महाराष्ट्र सरकार शेतकऱ्यांसाठी विविध योजना अंमलात आणत आहे. शेतकऱ्यांसाठी मागेल त्याला शेततळे, सौर ऊर्जा पंप, मागेल त्याला विहीर आदि. योजना शेतकऱ्यांसाठी जाहीर करण्यात आल्या आहे. शेतकरी सुद्धा या योजनेचा पाठपुरावा करून या योजनेचा प्रस्ताव तयार करून प्रशासनाला सादर करत आहेत. परंतु शेतकऱ्यांनी सादर केलेला प्रस्ताव हा प्रशासनाकडे आहे की तो कुठेतरी गहाळ झाला असे जर म्हटले तर तुम्ही चक्राहून झाल. असे कन्नड पंचायत समिती घडल्याचा प्रकार समोर येत आहे. त्याचे झाले असे की कन्नड तालुक्यातील चिमणापूर येथील शेतकरी जनार्दन काशिनाथ चव्हाण यांनी त्यांचे वडील नामे.काशिनाथ शंकर चव्हाण यांची महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत सिंचन विहिरीसाठी प्रस्ताव तयार करून कन्नड पंचायत समिती येथे दाखल केला होता.परंतु त्या दाखल केलेल्या प्रस्तावाची पोच घेऊन ती प्रस्तावाची माहिती जाणून घेण्यासाठी कन्नड पंचायत समितीच्या संबंधित विभागात गेले असता तेथे त्यांचा प्रस्ताव सापडला नसून तो गहाळ झाल्याचे सांगण्यात आले. संबंधित प्रस्तावाची पोच ही शेतकऱ्याकडे असून प्रस्ताव गहाळ झाला हे उत्तर ऐकून संबंधित शेतकरी चक्रावून गेले. मागेही कन्नड पंचायत समितीचे प्रस्ताव हे गौताळा अभयारण्यामध्ये आढळून आले होते. नेमके या प्रस्तावांना पाय फुटतात तरी कसे, हे प्रस्ताव जर गहाळ होतात तर त्यासाठी लागणारा खर्च व आपला प्रस्ताव मान्य होऊन आपल्याला सरकारची योजना मिळेल ही अशा धरून बसलेल्या शेतकऱ्याचे काय हा प्रश्न पुन्हा निर्माण होत आहे. तरी संबंधित विभागाने न्याय मिळवून देण्याचे मागणी शेतकऱ्यांनी केले आहे.
प्रतिक्रिया
मी माझे वडील काशिनाथ शंकर चव्हाण यांच्या नावाने कन्नड पंचायत समितीत सिंचन विहिरीसाठी प्रस्ताव सादर केला होता.त्याचा पाठपुरावा करण्यासाठी गेलो असता त्या ठिकाणी प्रस्ताव नसून तो गहाळ झाला असल्याचे सांगण्यात आले. शेतकरी प्रस्ताव व पाठपुराव्यासाठी खर्च करून योजनेसाठी प्रस्ताव सादर करतात. परंतु संबंधित योजनेचे प्रस्तावच गहाळ होत असल्याने या योजनेपासून शेतकरी वंचित राहत आहेत. तरी यामध्ये प्रशासनाने लक्ष घालून संबधित दोषीवर कारवाई करावी.(जनार्दन चव्हाण. वंचित शेतकरी)
What's Your Reaction?






