जागतिक महिला दिनानिम्मित मनपा महिला कर्मचारी यांचा सन्मान
जागतिक महिला दिनानिम्मित मनपा महिला कर्मचारी यांचा सन्मान माहिती व जनसंपर्क विभाग दि.११ मार्च छत्रपती संभाजी नगर महानगरपालिकेच्या वतीने जागतिक महिला दिनानिम्मित महानगरपालिकेतील महिला कर्मचारी यांचा सन्मान करण्यात आला आहे. मां.आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या मार्गदर्शनाखाली हा सन्मान सोहळा महिला व आयोजित करण्यात आला होता.मनपा मुख्यालय येथे पार पडलेल्या या सन्मान सोहळ्यात वर्ग २,०३ व वर्ग ०४ या संवर्गातील एकूण ९० महिला कर्मचारी यांचा प्रमाणपत्र व भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला. प्रारंभी मां.अतिरिक्त आयुक्त रणजीत पाटील व संतोष वाहुळे यांच्या हस्ते राजमाता जिजाऊ व क्रांती ज्योती सावित्री बाई फुले यांच्या प्रतिमेचे पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली.यावेळी अतिरिक्त आयुक्त रणजीत पाटील, संतोष वाहुळे,उप आयुक्त अपर्णा थेटे,उप आयुक्त तथा विभाग प्रमुख महिला व बाल कल्याण लखीचंद चव्हाण,सहायक आरोग्य अधिकारी डॉ अर्चना राणे,आरोग्य अधिकारी डॉ मनिषा भोंडवे,सहायक आयुक्त प्राजक्ता वंजारी,समाज विकास अधिकारी महिला व बाल कल्याण विभाग विनोद परदेशी,जयश्री दिवेकर यांची उपस्थिती होती.कार्यक्रमाचे सूत्र संचालन सांस्कृतिक कार्य अधिकारी शंभू विश्वासू यांनी केले. यावेळी विशाखा रुपल नांदगावकर यांचा जुन्या हिंदी व मराठी गीतांचा सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजित करण्यात आले होता.यावेळी महिलांसाठी फन गेम घेण्यात आले.विजेत्यांना बक्षीस वितरण करण्यात आले.या कार्यक्रमास मोठ्या संख्येने महिला कर्मचारी उपस्थित होत्या.

1.
What's Your Reaction?






