खुलताबाद नगरपरिषद प्रशासनाला आरपीआयचा दणका,चार वर्षांनी प्रलंबित वार्ड क्र ८ मधील नालीच्या

खुलताबाद नगरपरिषद प्रशासनाला आरपीआयचा दणका,चार वर्षांनी प्रलंबित वार्ड क्र ८ मधील नालीच्या कामाला मिळाला मुहूर्त खुलताबाद शहरातील वार्ड क्र ८ मधील नालीतील अडथळे आणि त्यामध्ये होणारी गाळाची समस्यामुळे आरोग्याच्या दृष्टीने देखील धोका निर्माण झाला होता. या नालीच्या दुरुस्तीचे काम गेल्या चार वर्षांपासून प्रलंबित झाल्याने स्थानिक नागरिकांमध्ये असंतोष होता. दरम्यान आज दि ३ डिसेंबर रोजी दुपारी दिड वाजता रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाचे जिल्हाध्यक्ष राकेश पंडित यांनी नगरपरिषद कार्यालयात भेट देत मुख्याधिकारी विक्रम दराडे यांची भेट घेतली आणी वार्ड क्र. ८ मधील चार वर्षांपासून प्रलंबित असलेल्या नालीच्या समस्येचा समाधान करण्याची आरपीआय स्टाईलमध्ये मागणी केली निवेदन ही दिले तसेच आठ दिवसांत काम ना झाल्यास तोंडावर काळे फासण्यात येईल असा इशारा दिला असता मुख्याधिकारी यांनी सबंधितांना तत्काळ याबाबत सुचना केल्या दरम्यान संबंधित विभागांनी याबाबत आजच आवश्यक कारवाई सुरू केली असून बांधकाम अभियंता यांनी वार्ड क्र ८ मधील नालीची पाहणी केली.ज्यामुळे येत्या काही दिवसांत नालीच्या समस्येवर समाधान मिळण्याची आशा येथील नागरिकांना झाली आहे. मुख्याधिकारी यांनी सांगितले की, संबंधित विभागांना कार्यवाही सुरू करण्याच्या आदेश दिले असून, येत्या काही दिवसांत नालीच्या दुरुस्तीचे काम पूर्ण होईल. यामध्ये नवीन नाली बांधणी, गाळ काढणे आणि इतर सुधारणा यांचा समावेश असणार आहे. स्थानिक नागरिकांनी आरपीआयचे जिल्हाध्यक्ष राकेश पंडित यांनी याबाबत घेतलेल्या दखल आणी त्यावर झालेल्या एक्शनचा स्वागत केले असून, त्यांना विश्वास आहे की समस्या लवकरात लवकर मार्गी लागेल.रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हाध्यक्ष राकेश पंडित,अनिल ढाले, सलमान खान, सरफराज पठाण, मिर्जा फजल बेग, मजहर खान,सय्यद सुलतान आदि नागरिक उपस्थित होते.

Dec 4, 2024 - 01:28
 0

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow