कन्नड बायपासच्या उड्डाणं पुलांच्या कामास सुरुवात ऑगस्ट २०२६ पर्यंत येणार पूर्णत्वास
कन्नड बायपासच्या उड्डाणं पुलांच्या कामास सुरुवात ऑगस्ट २०२६ पर्यंत येणार पूर्णत्वास मुजीब खान कन्नड प्रतिनिधी सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्गांवर साधारण ७३ कोटी रुपये खर्चून कन्नड शहराच्या बायपासला बहुप्रतीक्षेत असलेल्या दोन उड्डाणंपुलांचे काम सुरु झाले आहे.सदर पुलांचे काम साधारण ऑगस्ट २०२६ पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश आहेत. औरंगाबाद कडून प्रवेश करताना आणि चाळीसगावहुन कन्नडकडे प्रवेश अंधानेर फाट्या जवळ असे दोन्ही बाजूने दोन उड्डाणंपुलांचे काम सुरु झाले आहे. राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरु होते तेंव्हापासूनच दोन्ही बाजूला बायपास हवेत अशी मागणी लोकप्रतिनिधिसह नागरिक करत होते. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच्या (एन एच आय) तत्कालीन वरिष्ठ जिल्हा व विभागीय अधिकाऱ्यांना अनेकवेळा निवेदने दिली,मोर्चे काढले आंदोलने केली मात्र संबंधित अधिकारी जुमानले नाहीत.सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्ग सूरु झाला आणी या महामार्गाच्या "करोडी ते तेलवाडी" या टप्प्याच्या किस्से आणि कहानीला सुरुवात झाली. करोडी ते तेलवाडी दरम्यान अनेक त्रुटी निष्पन्न झाल्या.अनेक ठिकाणी पावसाचे पाणी रस्त्यावर साचून अपघात होने,रात्रीच्या वेळी पावसाचे पाणी समजून न येऊन होणारे अपघात,अधिकारी कर्मचारी केंद्राचे असल्याने रस्त्यावरील फलकांतील अनेक चूकांमुळे वाहन चालकांना होणारा मनस्ताप,अनेक ठिकाणी रस्त्यात खड्डे पडने,रस्ता खचून खड्डे पडल्याने वाहनांचे नुकसान व अपघात असे प्रकार नित्याचेच झाले होते. औरंगाबाद येथून कन्नड कडे प्रवेश करताना बायपास ला अनेकवेळा अपघात झाले आहेत तर दुसऱ्या बाजूला अंधानेर दिशेने देखील दरम्याच्या काळात अनेक अपघात होऊन जीवितहानी देखील झाली आहे.माजी खा.चंद्रकांत खैरे,माजी जी प अध्यक्ष आण्णा शिंदे,माजी नगराध्यक्ष संतोष कोल्हे,भाजपा जिल्हाध्यक्ष संजय खंबायते यांसह सर्वच पक्षाच्या नेत्यांनी निवेदने दिली.तत्कालीन केंद्रीय मंत्री डॉ.भागवत कराड,माजी खा.चंद्रकांत खैरे यांनी प्रत्यक्ष बायपास येथे प्राधिकरण च्या अधिकाऱ्यांना बोलावून खडे बोल सुनावले होते.अपघातांची जंत्री सुरूच होती.सदोष वळने,चुकीचे निकष,आणि मुजोर अधिकारी यांमुळे अनेकांचे जीव गेल्याचे अनेकजण आजही चर्चा करत आहे.शासनाच्या निधीचा अपव्यय करुन दर्जाहीन कामाचे मोठे उदाहरण म्हणजे करोडी ते तेलवाडी दरम्यानचा महामार्गा चा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल.वेळीच योग्य निर्णय घेऊन त्याचवेळी पूल बांधले असते तर आज परत रस्ता उखूडून पूल बांधायची नव्याने खर्च करायची गरज पडली नसती. प्रतिक्रिया मात्र आता पुलांचे काम सुरु झाले असून ते गुणवत्तापूर्ण दर्जेदार व्हावे.यात काही त्रुटी ठेऊ नये.पुलावरील पाण्याचा निचरा व्यवस्थित व्हावा जेणेकरून अपघात होणार नाहीत - 2)शासनाला उशिरा सुचलेल शहाणपण आहे मात्र जे होतय ते गरजेचे आहे. या नंतर तरी अपघात होऊन जिव जाणार नाहीत. इतिहासाची पुनरावृत्ती टळेल. 3) औरंगाबाद हुन येताना पहिल्या बायपासला शहरात येण्यासाठी सूचना फलक व्यवस्थित नसल्यामुळे बरेच वाहन चालक पुढे निघूण जातात व परत फिरून येताना अपघात घडतं होते. एन एच आय ने फलक लावणे अपेक्षित होते उलटपक्षी कन्नड नप ने लावलेले फलक देखील एनचआय हटविले होते. 4) याला एन एच आय चा शेखचिल्ली कारभारच म्हणावा लागेल.अगोदरच नियोजन करून शहाराची लोकसंख्या वाहणाची आवक जावक बघून त्याचवेळी लोकप्रतिनिधी नागरिक मागणी करत होते.मात्र देर आये खर्चा करके दुरुस्त आये.आता तरी दर्जेदार काम करावे ही माफक अपेक्षा.

1. कन्नड बायपासच्या उड्डाणं पुलांच्या कामास सुरुवात ऑगस्ट २०२६ पर्यंत येणार पूर्णत्वास
What's Your Reaction?






