कन्नड तालुक्यातील शिवना -टाकळी जलसंपदा विभागाचा मनमानी कारभार
कन्नड तालुक्यातील शिवना -टाकळी जलसंपदा विभागाचा मनमानी कारभार मुजीब खान कन्नड टाकळी प्रकल्पाच्या डाव्या व उजव्या कालव्याचे पाणी सुटून आठ दिवस झालेले आहे. जानेवारी महिन्यात डाव्या व उजव्या कालव्यातून हे पहिले आवर्तन सोडण्यात आले आहे. देवगावचा डावा कालवा १२ किलोमीटर आहे तरीही देवगाव पर्यंत प्रकल्प झाला तेव्हापासून पाणी आतापर्यंत कधीही गेले नाही तर वैजापूर कडे जाणारा उजवा कालवा जवळपास ५४ किलोमीटर आहे. परंतु १० ते १५ किलोमीटर च्या पुढे पाणी कधीही गेले नाही जागोजागी पाण्याची प्रचंड गळती आहे. मुख्य कालव्याचे आरसीसी अस्तरीकरण झालेले नाही पैसे मात्र निघालेले आहेत प्रत्यक्ष शेती पिकाला पाणी कुठेही मिळत नाही. शेत पोटचारीचेही कामं झालेले नाही त्यामुळे दोन्ही कालव्याचे पाणी ओढ्या नाल्यात जात आहे. शिवना - टाकळी धरण जेमतेम पावणे दोन टीएमसी आहे त्यात आता बोरसर पासून लासुर स्टेशन पर्यंत शिवना नदीच्या दोन्ही बाजूंच्या शेतकऱ्यांचे ७/१२ व १००० रुपये वर्गणी नदीपात्रात पाणी सोडण्यासाठी घेतली जात आहे. जवळपास ३५ ते ४० छोटे मोठे केटीवेअर सिमेंट बंधारे आहेत हे सगळे भरायचे ठरल्यास शिवना टाकळी प्रकल्प रिकामा होईल. शिवना टाकळी प्रकल्पाच्या पाण्यावर व शेतकऱ्यांवर प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नावर तालुक्यातील कोणतेही पुढारी अथवा अधिकारी यांचे लक्ष नाही . शिवना टाकळी प्रकल्पातून हतनूर, गल्लेबोरगाव, वेरूळ,जैतापूर, टापरगाव, अंतापुर ,आलापुर, देभेगाव, देवळाना ,ताडपिंपळगाव, देवगाव, चापानेर, जळगाव घाट व जवळी आदी सह १६ ते १७ गावांचा पाणीपुरवठा आहे . संबंधित ग्रामपंचायती देखील या प्रश्नावर मौन बाळगून आहेत, प्रकल्पाचे पाणी कमी झाल्यानंतर हे लोक प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या मोटार बंद करा, बागायती बंद करा असा पवित्रा घेत सातत्याने प्रकल्पग्रस्तांवर अन्याय होत असतो, शिवना टाकळी धरणाचे बॅकवॉटरच्या व लाभधारक शेतकऱ्यांनी जागृत होऊन नदीपात्रात पाणी सोडण्यास विचार करायला लावावा. नदीपात्रात पाणी सुटल्यास अवघ्या दहा ते पंधरा तासात धरण रिकामे होईल त्यामुळे प्रकल्पावर आधारित कन्नड तालुक्यातील शेतकरी व पाणी पुरवठा योजना धोक्यात येईल. पाणी पुरवठा योजना राबविण्यार्या ग्रामपंचायत यांनी गांभीर्याने विचार करावा व जलसंपदा विभागाचा मनमानी कारभार थांबवावा असे आवाहन प्रहार शेतकरी संघटना तालुका अध्यक्ष तथा प्रकल्पग्रस्त शेतकरी प्रकाश आहेर सह शेतकरयांनी केले आहे. प्रतिक्रिया प्रकाश आहेर - ( शेतकरी टाकळी लव्हाळी ) जलसंपदा विभाग मनमानी कारभार करत असुन कुठल्याही नियम न पाळता पाणी सोडले जात आहे. कालवा सल्लागार समिती ची बैठक येथे न घेता परस्पर घेऊन मनमानी कारभार सुरू आहे. या गंभीर प्रश्नाकडे तालुक्यातील कोणत्याही नेत्यांचे लक्ष नाही,

1. कन्नड तालुक्यातील शिवना -टाकळी जलसंपदा विभागाचा मनमानी कारभार
What's Your Reaction?






