आझाद एनजीओ तर्फे राष्ट्रीय बालिका दिना निमित्त आरोग्य व नेत्र तपासणी शिबिर संपन्न
आझाद एनजीओ तर्फे राष्ट्रीय बालिका दिना निमित्त आरोग्य व नेत्र तपासणी शिबिर संपन्न (औरंगाबाद - प्रतिनिधी) आझाद अली शाह शिक्षण संस्था खडकेश्वर द्वारे दौलताबाद येथे संचालित शायनिंग स्टार मराठी व इंग्रजी प्राथमिक शाळा आणि एम.जी.एम वस्तानवी उर्दू प्राथमिक व माध्यमिक शाळेत राष्ट्रीय बालिका दिनाचे औचित्य साधून अत्यंत उत्साहात आरोग्य व नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते . आझाद एनजीओ व लायन्स क्लब ऑफ चिकलठाणा औरंगाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांचे आरोग्य तपासणी तसेच दौलताबाद येथील पालकांसाठी व स्थानिक नागरिकांसाठी नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन आझाद अली शहा कॅम्पस मध्ये करण्यात आले होते . या कार्यक्रमाचे उद्घाटक आणि अध्यक्षस्थानी हिंदुस्थान उर्दु डेलीचे मुख्य संपादक नायब अन्सारी होते तर प्रमुख पाहुणे म्हणून समाजसेविका नुरून्नीसा या होत्या , तसेच यावेळी शायनिंग स्टार शाळेचे मु.अ. साजिद पाशा, एम.जी.एम.वस्तानवी शाळेच्या मु.अ. अमरीन खान व शाळेतील सर्व शिक्षक, विद्यार्थी व अनेक पालक उपस्थित होते. लायन्स क्लबचे कॅम्प आयोजक प्रज्वल मिठावाला, डॉ. सैफ खान, डॉ. शेखर यांनी उपस्थित डोळ्याने त्रस्त अनेकांची नेत्र तपासणी करून काहींना त्याच ठिकाणी चष्म्याचे वाटप केले तर काही लोकांना पुढील तपासणीसाठी व शस्त्रक्रियेसाठी समोरची तारीख दिली. सदरील शिबिरास खुप मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला व अत्यंत आनंदाने लोकांनी या निःशुल्क सेवेचा लाभ घेऊन आयोजकांचे व डॉक्टरांचे शाळेचे व संस्थेचे धन्यवाद करून ऋन व्यक्त केले. तसेच डॉ. कुलदीप धुताडे , डॉ. सारा पठाण , विकास मेश्राम व सुनील नेरपगार यांनी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांची आरोग्याची तपासणी करून आवश्यक ती औषधी दिली व तसेच विद्यार्थ्यांना आरोग्य विषयी योग्य तो सल्ला दिला. त्यानंतर आलेल्या सर्व पाहुण्यांचे व सर्व वैद्यकीय अधिकाऱ्यांचे शाळेतर्फे शाल व बुके देऊन सत्कार व सन्मान करण्यात आला तद्नंतर शाळेचे मु.अ. साजिद पाशा यांनी आपल्या मनोगतामध्ये विद्यार्थ्यांना आपली शरीर सुदृढ ठेवण्याचा सल्ला देऊन चांगल्या सवयी जोपासा, नियमित व्यायाम करा, योग्य आहार घ्या ज्यामुळे मन प्रसन्न राहील आणि अभ्यासात ही मन लागेल असा सल्ला दिला त्यानंतर त्यानंतर कार्यक्रमाचे उद्घाटक तथा अध्यक्ष नायब अन्सारी यांनी आपल्या मनोगतामध्ये संस्थेची आणि शाळेची व शाळेतील सर्व कर्मचाऱ्यांची स्तुती करून शाळेत या अगोदरही मी अनेक वेळा आलो आणि प्रत्येक वेळी माझ्या हे निदर्शनास आले की नवनवीन उपक्रम आपल्या संस्थेचे आणि शाळेच्या माध्यमातून सतत होत असतात आणि तेही शंभर टक्के यशस्वी होतात याचा मी साक्षीदार आहे, व कोणत्याही वेळी शाळेला व संस्थेला मदत करण्याचे आश्वासन ही दिले. यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन शेख आरीफ यांनी केले. मदिहा फातेमा, शुभांगी कुलकर्णी, बुरहाना पठाण, वैष्णवी दहाडे, धनश्री खिल्लारे, अशा ढाकणे, भक्ती बाळुबेटाळसे, शेख निदा, फौजिया शेख, शेख सुमैया, शेख निलोफर , सैयद सादिया, सैयद सोनम, शेख जिनत, सलमा खाला , नफीसा खाला, आदींनी कार्यक्रमाच्या यशस्वी साठी प्रयत्न केले. या नंतर विद्यार्थ्यांना जेवन देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. आपला साजिद पाशा (मुख्य प्रशासकीय अधिकारी) आझाद एनजीओ -- आजाद अली शाह शिक्षण संस्था, औरंगाबाद.

2. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी प्रकल्पास गती द्यावी - जिल्हाधिकारी दिलीप स्वामी
मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी प्रकल्पास गती द्यावी
- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी
छत्रपती संभाजी नगर, दि. 3. (जिमाका )-मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी हा शासनाचा महत्वकांक्षी कार्यक्रम आहे. या प्रकल्पाचे काम जिल्ह्यात वेगाने पुर्ण करण्यासाठी जमीन उपलब्धता करून द्यावी. त्यासंदर्भातील अडीअडचणी संबंधित तहसिलदार, पोलीस यंत्रणा , महावितरण यांनी समन्वव्याने सोडवून प्रकल्पास गती द्यावी असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी प्रकल्पाच्या आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना ,महावितरणचे सहव्यवस्थापकीय संचालक राहुल गुप्ता ,निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अशोक येरेकर, सामाजिक वनीकरण विभागाच्या उपसंचालक किर्ती जमदाडे, दूरदृष्यप्रणालीद्वारे सर्व तहसीलदार, गटविकास अधिकारी, व संबंधित यंत्रणांचे प्रमुख या बैठकीस उपस्थित होते.
तालुका निहाय मंजूर प्रकल्पाच्या जमिनीच्या उपलब्धतेबाबत आढावा जिल्हाधिकारी स्वामी यांनी घेतला. त्रुटी असलेल्या प्रकल्पाच्या ठिकाणी संयुक्त पाहणी ,जमीन मोजणीची प्रक्रिया पूर्ण करून घेऊन शासनाची जमीन सौर कृषी प्रकल्पास उपलब्ध करून द्यावी. जिल्ह्यातील मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनीचे काम गांभीर्यपूर्वक आणि प्राधान्याने पूर्ण करण्याबाबत सर्व सबंधित विभागांना सूचित करण्यात आले. यावेळी ज्या ठिकाणी प्रकल्प उभारणी शक्य होणार नाही अशा त्रुटी असणारे ठिकाणे बघून पर्यायी दुसरी जागा उपलब्ध करून देण्याबाबतचे निर्देश संबंधित तहसीलदार यांना जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिले. शासकीय जमिनीच्या ठिकाणी असलेल्या अतिक्रमण काढण्यासाठी पोलीस यंत्रणाचे सहकार्य घेऊन महावितरण आणि संबंधित यंत्रणेने या योजनेचे कामास गती द्यावी असे यावेळी सांगितले.
जिल्ह्यातील मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी बाबतचा आढावा घेऊन चार ते पाच दिवसांमध्ये सर्व परिपूर्ण प्रस्तावाबाबतचे अहवाल जिल्हा प्रशासनात सादर करण्याचे निर्देश देण्यात आले.
मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी प्रकल्प राबवितांना प्रकल्प विकासकांना ग्रामपंचायतीकडून ना हरकत प्रमाणपत्र घेण्याची आवश्यकता नसल्याने जमीन अतिक्रमीत झालेल्या ठिकाणी प्रकल्प विकासक तसेच महसूल ,पोलीस ,जिल्हा परिषद, वन विभाग, सार्वजनिक बांधकाम, सामजिक वनीकरण. महावितरण यांनी एकत्रित समन्वयाने या कामास प्राधान्य द्यावे. अतिक्रमीत जमिनीसंदर्भात समस्या सोडविण्यासाठी पोलीस यंत्रणा जबाबदारी पार पाडणार आहे.
मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी प्रकल्प वेळेत पूर्ण होऊन कार्यान्वित करण्याचें उद्दिष्ट जिल्ह्याने पूर्ण करण्याबाबतही जिल्हाधिकारी स्वामी यांनी निर्देशित केले.
What's Your Reaction?






