संत ज्ञानेश्वर उद्यान दि.२६ पर्यंत पर्यटकांसाठी खुले करण्याचे नियोजन करावे- खा.संदिपान भुमरे

संत ज्ञानेश्वर उद्यान दि.२६ पर्यंत पर्यटकांसाठी खुले करण्याचे नियोजन करावे- खा.संदिपान भुमरे छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) ३ जानेवरी:- पैठण येथील संत ज्ञानेश्वर उद्यानाच्या विकास व सुशोभिकरणाचे काम सुरु असून उद्यान पर्यटकांसाठी दि.२६ जानेवारी पर्यंत खुले करावयाचे आहे. त्यादृष्टीने उद्यान विकासाची उर्वरीत कामे गतिने पूर्ण करावीत असे, निर्देश खासदार संदिपान भुमरे यांनी दिले. संत ज्ञानेश्वर उद्यान विकास कामाच्या आढावा बैठकीचे जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजन करण्यात आले. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी,अपर जिल्हाधिकारी डॉ.अरविंद लोखंडे,उपविभागीय अधिकारी नीलम बाफना, मुख्य अभियंता जयंत गवळी, सब्बीनवार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अशोक येरेकर, जिल्हा नियोजन अधिकारी भारत वायाळ, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रकाश देशमुख, पैठण नगरपालिका मुख्याधिकारी नंदकिशोर भोंबे,तहसिलदार सारंग चव्हाण, पाटबंधारे विभागाचे उपविभागीय अभियंता दीपक डोंगरे व कनिष्ठ अभियंता तुषार विसपुते तसेच उद्यान विकास समितीचे सदस्य उपस्थित होते. पैठण येथील संत ज्ञानेश्वर उद्यानातील कारंजे, रस्ता, रंगरंगोटी, पाइपलाइन दुरुस्ती, मुलांसाठी साहसी क्रीडा पार्क या कामांसाठी २७ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. या निधीचे योग्य उपयोजन करुन नागरीकांना दर्जेदार सुविधा उद्यानात उपलब्ध करुन द्याव्या. वेळेत आणि दर्जेदार कामे पूर्ण करून पर्यटकांना दि.२६ जानेवारी पासून हे उद्यान पाहण्यासाठी खुले करावे,असे निर्देश खा.भुमरे यांनी दिले. उद्यान विकास करतांना त्यात रंगीत प्रकाश योजनेसह संगीतमय कारंजांसाठी पाईपलाईन आणि दर्शनी भागातील रंगरंगोटी ही लवकरात लवकर करून घ्यावी. उद्यानात जाणारा मुख्य रस्त्याचे काम पूर्ण करावे. वीज देयक थकबाकी पुर्ण भरुन उद्यानामध्ये लवकरात लवकर सर्व सुविधा उपलब्ध होतील यासाठी महावितरण, जायकवाडी लाभ क्षेत्र, सार्वजनिक बांधकाम, संबंधित कामाचे कंत्राटदार यांनी आपापसात समन्वय राखणे आवश्यक आहे, असे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी निर्देश दिले. या प्रकल्पामुळे जिल्ह्यातील पर्यटनाला चालना मिळेल, त्यादृष्टिने या कामास गती द्यावी असेही सांगण्यात आले. कामासंदर्भात प्रस्तावित आराखड्यातील तरतूदीबाबत सर्व संबंधित अधिकारी, स्थानिक नागरिक, उद्यान समितीचे सदस्य यांच्याही सूचनांचा अंतर्भाव उद्यानाच्या दुरुस्तीच्या कामकाजात करावा, असे जिल्हाधिकारी यांनी संबंधित यंत्रणेला सांगितले.

Jan 3, 2025 - 23:41
 0
1 / 1

1.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow

Er.M.A. Shakeel Senior Journalist,Social and Political activist Sportsman,Singer.District VicePresident Human Right Council of India.