आजुबाई शिक्षण संस्थेत तर्फे क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आली

आजुबाई शिक्षण संस्थेत तर्फे क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आली मुजीब खान कन्नड प्रतिनिधी : मंगळवार दिनांक ३१ डिसेंबर२०२४ रोजी आजुबाई शिक्षण संस्थेत, शाश्वत बहुद्देशीय सेवाभावी संस्था संचलित, नेहरू युवा केंद्र, छत्रपती संभाजीनगर, तर्फे तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धे साठी प्रमुख पाहुणे म्हणून मा. . सानप , पोलीस निरीक्षक, कन्नड उपस्थित होते, तसेच तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन आजुबाई शिक्षण संस्थेच्या संचालिका वंदना देशमुख मॅडम यांच्या हस्ते करण्यात आले. या तसेच या तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत कन्नड शहरातील संत ज्ञानेश्वर विद्यालय, आजुबाई माध्यमिक विद्यालय, काशीनाथराव पाटील विद्यालय कर्मवीर काकासाहेब देशमुख उच्च माध्यमिक विद्यालय, सूर्योदय माध्यमिक विद्यालय सहभागी झाले होते, या स्पर्धेत आजुबाई शिक्षण संस्थेचे कर्मवीर काकासाहेब देशमुख उच्च माध्यमिक विद्यालय हिराईनगर च्या मुलांच्या संघाने कबड्डी खेळात प्रथम क्रमांक पटकावला , तसेच आजुबाई माध्यमिक विद्यालयातील मुलींनी खो-खो खेळात प्रथम क्रमांक पटकावला. सर्व विजयी खेळाडूंना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पारितोषिक देण्यात आले व आजुबाई शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुधाकर देवकर सर, संचालिका वंदना देशमुख मॅडम, मा. अतुल धाटबळे सर, सचिव शाश्वत सेवाभावी संस्था, चापानेर ता. कन्नड, अविनाश काळे सर क्रीडाधिकारी कन्नड तालुका, गोसावी सर, पांडव सर व विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वि द्यार्थी उपस्थित होते.

Jan 2, 2025 - 20:32
 0

3.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow