आजुबाई माध्यमिक विद्यालयात आनंदनगरी मेळावा उत्साहात साजरा.
कन्नड प्रतिनिधी मुजीब खान : कन्नड आजुबाई शिक्षण संस्था संचलित आजुबाई माध्यमिक विद्यालयात शनिवार दि. २८ डिसेंबर २०२४ रोजी आजुबाई शिक्षण संस्थेत सालाबादाप्रमाणे ह्या वर्षी ही आनंद नगरीचे आयोजन करण्यात आले. आनंद नगरी मध्ये सहभागी होत विद्यार्थ्यांनी अनेक प्रकारच्या अन्न पदार्थांचे स्टॉल लावले होते. त्यातून विद्यार्थ्यांनीव्यावहारिक ज्ञाना बद्दल माहिती मिळवली. तसेच या आनंद नगरीचे उद्घाटन शमाबी बहुउद्देशीय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष वसीम अमीर शेख यांच्या हस्ते करण्यात आले, याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून आजुबाई परिवाराचे स्नेहीमा. प्राध्यापक श्री. विजय भोसले सर, सावित्रीबाई फुले उच्च माध्यमिक विद्यालय कन्नड,व श्री आजुबाई शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुधाकर देवकर सर, संचालिका वंदना देशमुख मॅडम, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
1.
What's Your Reaction?






