HMP Virus व्हायरसमुळे मृत्यूचा धोका नाही .
HMP Virus व्हायरसमुळे मृत्यूचा धोका नाही : HMP Virusव्हायरस हा धोकादायक व्हायरस नाही. तसेच हा व्हायरस भारतात आधीपासूनच अस्तित्वात होता. त्यामुळे प्रत्येक भारतीयांमध्ये या व्हायरसच्या विरोधात लढणाऱ्या अँटीबॉडीज आहेत. त्यामुळे घाबरण्याचे काही कारण नाही. या व्हायरसमुळे मृत्यूचा धोकाही नसल्याचं सीएसआयआरचे माजी डायरेक्टर जनरल डॉक्टर शेखर मांडे यांनी म्हटलंय. या व्हायरसची कोरोना सारखीच लक्षणे आहेत. मात्र, घाबरून जायचे कारण नाही. या व्हायरसमुळे मृत्यूचा धोका नाही. या व्हायरस विरोधात लढण्यासाठी भारतीयांमध्ये अँटिबाडीज आहेत, त्यामुळे घाबरून जाऊ नका. कोरोना सारखा हा नवीन व्हायरस नाहीये. भारतात देखील हा व्हायरस नवीन नाही. जुनाच व्हायरस असल्याने त्याचा जास्त धोका नाही, असंही डॉक्टर शेखर मांडे म्हणाले आहेत

1.
What's Your Reaction?






