कन्नड नगरपरिषदेसमोर ढोल बजाव आंदोलन संपन्न
मुजीब खान कन्नड( प्रतिनिधी). :कन्नड दिनांक ८ कन्नड शहरात शिवसेना ठाकरे गटाचे वतीने कन्नड शहरातील स्वच्छता, पाणी प्रश्न, पथदिवे, मोकाट जनावर व नागरी सुविधा यासाठी ३० डिसेंबर २०२४ रोजी तहसीलदार यांना निवेदन दिले होते. त्याच्यावर कारवाई न झाल्यामुळे झोपी गेलेल्या नगरपालिकेला जागी करण्यासाठी आज ढोल बजाव आंदोलन करण्यात आले. सकाळी ११ वाजता कन्नड नगर परिषदे समोर व जुन्या तहसील समोर ढोल वाजून हा परिसर अक्षरशः दणदणून सोडला रोडवर येणाऱ्या जाणाऱ्यांचे गर्दी झाली बऱ्याच वेळ ढोल वाजेत असल्यामुळे नगरपालिकेतील कर्मचारी गेटवर येऊन मुख्याधिकारी नंदकिशोर भोंबे यांच्या सूचने नुसार कार्यालयीन ऑफिसर प्रशांत देशपांडे यांनी लेखी स्वरूपात पुढील काम करण्याचे आश्वासन दिले. याप्रसंगी शिवसेना शहर प्रमुख तथा माजी उपनगराध्यक्ष डॉ सदाशिव पाटील, उपतालुकाप्रमुख शिवाजी थेटे, सामाजिक कार्यकर्ते डॉ खालील पटेल, उपशहर प्रमुख चंद्रकांत लाडे, सलमान शेख, प्रकाश काचोळे, विभाग प्रमुख उदय सोनवणे, उपविभाग प्रमुख राजीव पवार, सामाजिक कार्यकर्ते गोकुळ राठोड, शेख अमुभाई, संतोष बनकर, पंकज चव्हाण, राज ठाकूर, सचिन गिरे, विकास खाजेकर, भोला पवार, दिनेश अग्रवाल, विशाल शिंदे, अर्जुन मटकर, संदीप गुटुरसिंग, दीपक वाघ, नगरपालिकेतर्फे पाणीपुरवठा निरीक्षक देविदास पाटील, फसवद्दीन शेख वसुली विभाग, विद्युत अभियंता राहुल करडे, आरोग्य निरीक्षक पवन परदेशी, सिद्धार्थ बनकर व इत्यादी नागरिक व कार्यकर्ते उपस्थित होते
What's Your Reaction?






