माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांना नागपूरला अटक
माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांना नागपूरला अटक मुजीब खान कन्नड (प्रतिनिधी) कन्नड चे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांना पोलिसांनी १७ फेब्रुवारी दुपारी चार वाजता च्या सुमारास नागपुरात अटक केली शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याच्या गुन्ह्यात जाधव हे न्यायालयात हजर झाले होते न्यायालयाने जाधव यांना अटक करून कारागृहात रवानगी करण्याचे आदेश दिले होते त्यानंतर पोलिसांनी जाधव यांना ताब्यात घेतले छातीत दुखत असल्याची तक्रार केल्यामुळे जाधव यांना मी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी २०१४ मध्ये विमानतळावर उद्धव ठाकरे आल्यानंतर त्यांच्या मंत्रालयीन सहायकाला शिवीगाळ करून मारहाण केली होती त्यावेळी त्या मंत्रालयीन सहायकाने सोनेगाव पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दिली होती त्या तक्रारीवरून सोनेगाव पोलीस आणि जाधव यांच्यावर शिवीगाळ करणे आणि शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता २०१४ मध्ये गुन्हा दाखल करून पोलिसांनी न्यायालयात आरोप पत्र दाखल केले होते

2. Mohammadia Urdu Private School Makaranpur Annual Friendship Meet inaugurated by Hon'ble MLA Mrs. Sanjanatai Jadhav
मोहम्मदिया उर्दू प्रा.शाळा मकरणपुर वार्षिक स्नेहसंमेलनाचा मा.आमदार सौ.संजनाताई जाधव यांच्या हस्ते उदघाटन
मुजीब खान कन्नड (प्रतिनिधी)
दिनांक १७ फेब्रुवारी २०२५ रोजी दि रहेमानिया वेल्फेअर एज्युकेशन सोसायटी संचलित मोहम्मदिया उर्दू प्राथमिक शाळा मकरणपुर या शाळेच्या शै.वर्ष २०२४-२५ चा वार्षिक स्नेहसंमेलन पार पडला .
सदर कार्यक्रमाचे उदघाटन तालुक्याच्या आमदार सौ. संजना जधाव यांच्या हस्ते करण्यात आले तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष सै. अहेमद अली भैय्या .
प्रमुख पाहुणे म्हणून कन्नड नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष अ. जावेद सेठ तसेच मकरणपुर सोसायटी चेअरमन अ. वहाब अनवर बागवान( मा.उपसरपंच) जमील मिस्त्री(मा.उपसरपंच),सुभान पटेल(ग्रा.प.सदस्य).अनिल वने(माजी सैनिक),आसिफ शेख(ग्रामपंचायत),वाहेद पटेल नवाब ठेकेदार, सै. अश्फाक कुरेशी, सै .अल्ताफ कुरेशी, युनूस मामु केलेवाले, आसिफ बॉण्ड, शब्बू अण्णा, इलियास पटेल, अय्युब खान सर, उस्मान खान,शेख गयास, श्री.गोरख पाटील (पत्रकार), आकीब अहेमद (पत्रकार), शेख जहीर, शेख रशीद , आणि दि रहेमानिया वेल्फेअर एज्युकेशन सोसायटी सर्व संचालक शेख मुजमिल पटेल, शेख युनूस कादर , शेख हारून सेठ, सै. अबेद अली अहेमद अली, सै. अख्तर अली मोहंमद अली ,शेख मुबिन महेबूबदौला, तसेच खान जबीन (मुख्यध्यापिका), शगुफ्ता कुलसुम (मुख्यध्यापिका), अमीन शेख ( मुख्यध्यापक) कादरी सबहात (मुख्यध्यापिका) पालक तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सदर कार्यक्रमात मुलांनी भाषण, गायन, नृत्य,अभिनय इतयादी आपल्या वेगवेगळ्या कलागुणांचे सादरीकरण करून प्रेक्षकांची मने जिंकलीत.
मा. आमदार संजनताई जाधव यांनी आपले विचार मांडताना चिमुकल्यांचे तोंडभरून कौतुक केले आणि समाजच्या विकासात शिक्षणाचे महत्वाचे स्थान पटवून देतांना शिक्षकांनी देखील स्पर्धात्मक युगाचा वैचारिक दृष्टिकोन ठेऊन पालकांच्या अपेक्षापूर्ती कराव्यात अशी अपेक्षा व्यक्त केली.
संस्था अध्यक्ष सै. अहेमद अली भैय्या यांनी देखील आपले विचार मांडतांना मकरनपूर येथूनच प्राथमिक शिक्षण घेऊन देशसेवा पूर्ण करू निवृत्त झालेल्या माजी सैनिक अनिल वने यांचे उदाहरण देत शिक्षणामुळेच आपले सामाजिक जीवन कसे सुरळीत होऊ शकते हे पटवून दिले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक सलमान फारुकी, मुदस्सर खान, शेख वसीम, शेख राजिक, सलमान खान, शेख अजीज, सै. जुनेद ,शेख हिना इत्यादींनी परिश्रम घेतले
मुख्यध्यापक आलम खान यांनी आभार व्यक्त करत राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता केली.
What's Your Reaction?






