पिशोर पोलीसांचा गांजा छापा एक लाख ९५३६०रु गांजा जप्त. आरोपी गजा आड
पिशोर पोलिस ठाणे पोलीस ठाण्याच्या हद्दीत चिंचोली (लिं) बिट मधील वाकोद शिवारात कपाशीच्या शेतात गांजा असलेल्यांची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजीराव नागवे यांना खबऱ्यामार्फत माहिती मिळाली. नागवे यांनी आपले विश्वासनीय गोपनीय पथक तयार करून सांगितल्या टिकाणी खात्री करून घेतली. पथकाने सांगितले की माहिती खरी आहे. असे सांगताच लगेच कर्मचाऱ्यांना सांगितले की तिथेच थांबा लगेच याबाबतची माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी कन्नड विजय कुमार ठाकुरवाड यांना दिली. ठाकूरवाड यांनी विलंब न करता पिशोर पोलीस ठाणे गाठून हद्दीतील वाकोद शिवारात घटनास्थळी पोलीस निरीक्षक शिवाजीराव नागवे, दुय्यम अधिकारी रतन डोईफोडे पो. कॉ.विलास सोणवने, किरण गंडे, परमेश्वर दराडे, वसंत पाटील, गंगाधर भदाणे, गजानन कराळे यांना सोबत घेऊन मंगळवारी दुपारी गट क्रमांक ३११ कपाशीच्या शेतात छापा मारला असता २२ जिवंत ओले गांजा सदृष्ट झाडे दिसून आले. ज्याची उंची सात फुट,काहींची उंची पाच फूट,असे २२ गांजाचे रोपटे मिळून आले. जप्तकर्त्या वेळेस सरकारी कृषी मंडळाधिकारी जगदिशसेन गायकवाड वन विभागाचे कर्मचारी हजर होते. ओले झाडे ज्याचे वजन ३२किलो ५६० ग्रॅम असून त्याची किंमत प्रति किलो ६०००रू एकूण एक लाख ९५ हजार ३६०रु गांजा जप्त केला.
आरोपी भाऊसाहेब नेमिनाथ जैन (वय४७)रा.वाकोद यास ताब्यात घेतले. पिशोर पोलीस ठाण्यात आणून आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजीराव नागवे करीत आहे.
What's Your Reaction?






