मतदार जनजागृतीसाठी हॉट एअर राईड दि.१६(जिमाका)- विधानसभा निवडणूक २०२४ च्या

Nov 16, 2024 - 23:44
 0

मतदार जनजागृतीसाठी हॉट एअर बलुन राईड

छत्रपती संभाजीनगर, दि.१६(जिमाका)- विधानसभा निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने मतदार जनजागृतीचा भाग म्हणून हॉट ए अर बलुनचा वापर करण्यात येत असून दि.१६ ते दि.१९ पर्यंत हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. आज या उपक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आली. हॉट ए अर बलुन राईड ची सुविधा नागरिकांना उपलब्ध करुन त्याद्वारे मतदार जनजागृती करणे अशी ही संकल्पना आहे.

 विभागीय क्रीडा संकूल येथे आयोजीत या उपक्रमाच्या प्रारंभी विभागीय आयुक्त दिलीप गावडे, छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विरेंद्र मिश्रा,जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, निवडणूक निरीक्षक बिद्यानंद सिंग (१०४-सिल्लोड, १०५- कन्नड), तलत परवेज(१०६-फुलंब्री,१०७-औरंगाबाद मध्य), उज्ज्वलकुमार सिंग (११०-पैठण, १११- गंगापूर, ११२ वैजापूर), पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड, पोलीस आयुक्त प्रवीण पवार, उपजिल्हा निवडणूक अधिकारी देवेंद्र कटके, मनपा उपायुक्त अंकुश पांढरे, स्वप्निल सरदार आदी उपस्थित होते.

 जिल्हा मतदान जनजागृती कक्ष, महाराष्ट्र पर्यटन संचालनालय,मराठवाडा पर्यटन विकास संघटना यांच्या वतीने या उपक्रमाचे आयोजन दि.१९ पर्यंत विभागीय क्रीडा संकुल मैदान छत्रपती संभाजीनगर येथे सकाळी ७ ते १० व सायंकाळी ४ ते ७ या वेळेत होणार आहे. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन संजीव सोनार यांनी केले.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow