टपाली मतपत्रिकांचे राज्यसमन्वय केंद्रात संकलन व वितरण सुरु छत्रपती संभाजीनगर,
टपाली मतपत्रिकांचे राज्यसमन्वय केंद्रात संकलन व वितरण सुरु
छत्रपती संभाजीनगर, दि.१६(जिमाका)- राज्याचे टपाली मतपत्रिका राज्यसमन्वय केंद्र छत्रपती संभाजीनगर येथे तयार करण्यात आले आहे. राज्यतील सर्व जिल्ह्यातील २८८ विधानसभा मतदार संघातील टपाली मतपत्रिकांचे छत्रपती संभाजीनगर येथे तयार करण्यात आलेल्या राज्य समन्वय केंद्रात संकलन व वितरण केले जात आहे. सुमारे २२ हजार हून अधिक मतदान झालेल्या व मतदान व्हावयाच्या मतपत्रिकांचे हस्तांतरण या ठिकाणी सुरु आहे. निवडणूक कर्मचाऱ्यांच्या राज्यातील जिल्ह्यांमधून कानाकोपऱ्यातील मतदार संघातून आपापल्या टपाली मतपत्रिका मागवणे व टपाली मतपत्रिकांवर मतदान करुन त्या त्या मतदार संघातील निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचविणे यासाठी राज्य समन्वय केंद्र छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय कला महाविद्यालयात स्थापित करण्यात आले आहे. राज्यातील जिल्ह्यांतून मतपत्रिका येथे आणल्या जाऊन येथून पुढे त्या संबंधित जिल्ह्यात पाठविण्यात येत आहेत. त्याच प्रमाणे मतदान झाल्यावर हीच प्रक्रिया राबविली जात आहे, अशी माहिती नोडल अधिकारी प्रभोदय मुळे यांनी दिली. आज दुपारी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी दिलीप स्वामी यांनी भेट देऊन या केंद्राची पाहणी केली.
०००००
What's Your Reaction?






