‘पंतप्रधान इंटर्नशिप योजना’, लाभ घेण्याचे आवाहन
‘पंतप्रधान इंटर्नशिप योजना’, लाभ घेण्याचे आवाहन छत्रपती संभाजीनगर, दि.१३- पंतप्रधान इंटर्नशिप योजनेच्या दुसऱ्या फेरीसाठी पुन्हा अर्ज प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. या योजने अंतर्गत २१ ते २४ वर्षे वयोगटातील तरुणांना इंटर्नशिप दिली जाणार आहे. कोणत्याही ठिकाणी नोकरी करीत नसलेल्या युवकांसाठी ही योजना आहे. या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता केंद्राचे सहायक आयुक्त सुरेश वराडे यांनी केले आहे. पात्रता : · वय २१ ते २४ वर्षे यादरम्यान असणे आवश्यक आहे. · शैक्षणिक पात्रता १० वी पास/ १२ वी पास/ आयटीआय / डिप्लोमा/ पदवीधर · रुपये ८ लाखाच्या आतील उत्पन्न मर्यादा असणे आवश्यक आहे. · NAPS / NATS अंतर्गत ॲप्रेंटीस केलेली नसावी. · कुटुंबातील सदस्य(यामध्ये आई-वडील, स्वत :) शासकीय सेवेत नसलेला व्यक्ती अर्ज करू शकेल. · पुर्णवेळ शिक्षण घेत नसलेला उमेदवार यासाठी पात्र असेल. अर्ज कसा करावा : · या योजनेसाठी अर्ज करुन इच्छिणाऱ्या उमेदवारांनी http://pminternship.mca.gov.in/ या वेबसाईटवर प्रोफाईल तयार करून विविध क्षेत्रातील इंटर्नशिपसाठी अर्ज करावा · उमेदवार अर्ज करण्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत तीन इंटर्नशिपसाठी अर्ज करु शकतात. · अर्ज करण्याची अंतिम तारीख ३१ मार्च २०२५ आहे. पंतप्रधान इंटर्नशीपमधून मिळणारे लाभ : · या अंतर्गत युवकांना १२ महिन्यांसाठी इंटर्नशिप मिळेल. · इंटर्नशीपसाठी रुजू झाल्यावर सुरुवातीला एकवेळचे सहा हजार रुपये एकरकमी अनुदान दिले जाईल. · त्यानंतर प्रत्येक महिन्यासाठी ५ हजार रुपये विद्यावेतन दिले जाईल. विमा सुरक्षा : · योजनेमध्ये सहभागी प्रशिक्षणार्थ्यांना १२ महिन्यासाठी प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना आणि प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेअंतर्गत सुरक्षा प्रदान करण्यात येणार आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करावे,असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता केंद्राचे सहायक आयुक्त सुरेश वराडे यांनी केले आहे.
1.
What's Your Reaction?






