तब्बल १५ वर्षांनंतर शिक्षक आरोपीला कन्नड शहर पोलिसांनी चाळीसगाव येथून केली अटक

२००८ मध्ये घडलेल्या गुन्ह्याचा उलगडा करून, पंधरा वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देणारा फरार - शिक्षक आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. शिक्षक असलेल्या आरोपीवर शाळेच्या नसंरक्षक भिंत व डागडुजी प्रकरणी अफरातफर करून शासनाची फसवणूक प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. याबाबत न अनेक कांगावे असून २००८ साली कन्नड न शहरातील जिल्हा परिषद शाळेत कार्यरत असलेले शिक्षक भाऊसाहेब कडुबा कुमावत यांनी शाळेच्या बांधकामात अपहार केल्याप्रकरणी त्यांच्यावर २००९ साली कन्नड शहर पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले होते. यानुसार तब्बल पंधरा वर्षांनंतर पेशाने शिक्षक असलेला गुन्हेगार अखेर पोलिसांना पकडण्यात यश आले आहे. सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक नासेर पठाण यांनी या प्रकरणी छडा लावून आरोपीस चाळीसगाव येथून जेरबंद करून कन्नड कोर्टात हजर केले असता न्यायालयाने त्यास न्यायालयीन कोठडी सुनावली असून आरोपीची हसूल कारागृहात रवानगी करण्यात आली अशी माहिती कन्नड शहर पोलिस ठाण्याच्या वतीने आज दि ८ डिसेंबर रोजी दुपारी एक वाजता देण्यात आली.
What's Your Reaction?






