घाटीतले दोन रुग्ण सुखरूप वृद्धआश्रमात राफाएला फाउंडेशनचा स्तुत्य उपक्रम
घाटीतले दोन रुग्ण सुखरूप वृद्धआश्रमात राफाएला फाउंडेशनचा स्तुत्य उपक्रम छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधि): घाटी रुग्णालयात दोन बेघर रुग्णावर उपचार सुरू होता,राफाएला फाउंडेशनचे कर्मचारी त्यांना दररोज भेटत असतं, त्यांच्या तब्बेतीची काळजी घेत होते, काही दिवसात त्या रुग्णाची तब्बेत तंदूरुस्त होताच राफाएला फाउंडेशनचे अध्यक्ष राजेश सक्सेना यांनी रुग्णांना दैवत वृद्धआश्रमात सुखरूप सोडवले आहे. सदर कार्यासाठी संस्थेचे कार्यकर्ते व संस्थापक अध्यक्ष अनेक कार्यकर्ते समस्त लोक उपस्थित होते अध्यक्ष राजेश सक्सेना समाजसेवक जेम्स नाटकर, अरविंद विलास जमदाडे तथा महिला मंडळ याच्यामध्ये निशा राजे सक्सेना, सुमित्रा देवराज खांडेकर, लीना जितेंद्र खांडेकर कार्य सिद्धेश नेले आणि विशेष सहकार्य आम्हाला बजेटसाठी आतिफ अब्दुल वाहेद आणि आसिफ अन्वर खान यांनी मदतकार्य केले आहे. राफाएला फाउंडेशन शहरातील गरीब बेघर लोकांना मदतीचा हात देते, त्यांना मदत करते, त्यांना हक्काच घर मिळवून देते.राफाएला फाउंडेशन अध्यक्ष राजेश सक्सेना गेल्या २५ वर्षांपासून समाजसेवा करीत आहे. त्यांचं कार्य भव्यदिव्य आहे.
What's Your Reaction?

