राष्ट्रीय कुष्ठरोग निमुर्लन कार्यक्रम; ५५ रुग्ण आढळले

राष्ट्रीय कुष्ठरोग निमुर्लन कार्यक्रम; ५५ रुग्ण आढळले छत्रपती संभाजीनगर,(औरंगाबाद)दि.२४ (प्रतिनिधि) जिल्ह्यात कुष्ठरुग्ण शोध मोहिम ‘कुष्ठमुक्त सुरक्षित महाराष्ट्र’(कुसुम) अंतर्गत राबविण्यात आले. या अंतर्गत दि.१६ ते २० या कालावधीत जिल्ह्यात ५५ रुग्ण शोधण्यात आले आहेत. हे सर्व रुग्णांवर उपचार सुरु करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभय धानोरकर यांनी दिली आहे. जिल्ह्यात कुष्ठरुग्ण शोध मोहीमे अंतर्गत तयार करण्यात आलेल्या सुक्ष्म कृती आरखड्यानुसार एकुण ३७ हजार जोखीम क्षेत्रातील व्यक्तिंची तपासणी करण्यात आली. त्यात संशयित ९५२ रुग्णांची तपासणी करण्यात आली. त्यामधुन ५५व्यक्ती कुष्ठरुग्ण असल्याचे चाचणीअंती निष्पन्न झाले.त्यातील २१ जण संसर्गिक व ३४ जण असंसर्गिक असल्याचे आढळून आले आहे. या रुग्णांवर नियमित उपचार सुरु करण्यात आले असून नियमित व विहित कालावधीतील उपचार पूर्ण केल्यावर हे रुग्ण पूर्ण बरे होतील असे डॉ. धानोरकर यांनी सांगितले. तालुकानिहाय आढळलेले रुग्ण या प्रमाणे- छ.संभाजीनगर-२, गंगापुर-३, कन्नड-८,खुलताबाद-१,पैठण- ७,सिल्लोड-१०, सोयगांव-८,फुलंब्री-१, वैजापुर-२, म.न.पा कार्यक्षेत्र -८. एकुण ९५२ संशयित रुग्णांची तपासणी केल्यानंतर ५५ जण रुग्णसल्याचे आढळून आले. ही मोहिम यशस्वी करण्यासाठी सहायक संचालक कुष्ठरोग डॉ.शिवकुमार हलकुडे यांच्या मार्गदर्शनात सर्व तालुका आरोग्य अधिकारी, प्रा.आ.केंद्राचे वैद्यकीय अधिकारी, आरोग्य कर्मचारी, आशा स्वयंसेविका यांनी परिश्रम घेतले

Dec 25, 2024 - 04:19
 0
1 / 1

1.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow

Er.M.A. Shakeel Senior Journalist,Social and Political activist Sportsman,Singer.District VicePresident Human Right Council of India.