महाराष्ट्र वाहतूक सेनेचे सर्व पदाधिकारी यांनी घेतली विधान परिषद विरोधी पक्ष नेते अंबादासजी दानवे साहेब यांची भेट
महाराष्ट्र वाहतूक सेनेचे सर्व पदाधिकारी यांनी घेतली विधान परिषद विरोधी पक्ष नेते अंबादासजी दानवे साहेब यांची भेट या भेटीमध्ये चर्चा करण्यात आली शहरातील वाहनचालकांच्या अडीअडचणी आरटीओ ऑफिस पोलीस प्रशासन महानगर पालिका या सर्व अधिकाऱ्यांचा आढावा घेऊन बैठक घेण्याचे आश्वासन शिवसेना नेते व विधान परिषद विरोधी पक्ष नेते अंबादासजी दानवे साहेब यांनी दिले यावेळी महाराष्ट्र वाहतूक सेनेचे जिल्हाध्यक्ष सलीम खामगावकर जिल्हा कार्याध्यक्ष महेंद्र साळवे जिल्हा उपाध्यक्ष दत्ताभाऊ नागरे समन्वय जिल्हाध्यक्ष एमडी फारूक शहर उपाध्यक्ष सुभाष कदम शहर उपाध्यक्ष रफिक कुरैशी शहर कार्याध्यक्ष सय्यद अली व पूर्व शहराध्यक्ष स्वामीनाथ वीर यांची प्रमुख उपस्थिती मध्ये चर्चा करण्यात आली व पुढील रूपरेषा ठरवण्याचे आदेश दानवे साहेबांनी दिले

2. प्राथमिक आरोग्य केंद्र पद भरती घोटाळा मुजीब खान कन्नड (प्रतिनिधी) सिल्लोड तालुक्यामध्ये नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र २०२२ मध्ये मेडिकल ऑफिसर, स्टाफ नर्स आणि लॅब टेक्निशियन पदभरती करताना मोठी अनियमित्ता व घोटाळा झाला आहे असे तक्रार सिल्लोड येथील सामाजिक कार्यकर्ता शेख अमान शेख शौकत अली यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल केला होता. त्या तक्रारीमध्ये शेख अमान यांनी सबळ पुरावा सादर केला म्हणून जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अभय धानोरकर यांनी स्त्री सदस्य चौकशी समिती गठित केली होती.
प्राथमिक आरोग्य केंद्र पद भरती घोटाळा
मुजीब खान कन्नड (प्रतिनिधी) :
सिल्लोड तालुक्यामध्ये नागरी
प्राथमिक आरोग्य केंद्र २०२२ मध्ये मेडिकल ऑफिसर, स्टाफ नर्स आणि लॅब टेक्निशियन पदभरती करताना मोठी अनियमित्ता व घोटाळा झाला आहे असे तक्रार सिल्लोड येथील सामाजिक कार्यकर्ता शेख अमान शेख शौकत अली यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल केला होता. त्या तक्रारीमध्ये शेख अमान यांनी सबळ पुरावा सादर केला म्हणून जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अभय धानोरकर यांनी स्त्री सदस्य चौकशी समिती गठित केली होती. समितीने सखोल चौकशी करून दहा मुद्द्यावर आपला अहवाल सादर केला. त्यामध्ये चौकशी समितीने सकृत दर्शनी एक ते दहा मुद्द्यावर त्रुटी आढळून आले आहे असे अभिप्राय नोंद केला.
पदभरती मध्ये विहित गाईडलाईन्स चा उल्लंघन झाला आहे. गाईडलांच्या वेळापत्रका अगोदरच नियुक्ती करण्यात आले. ऑनलाइन पात्र अपात्र यादी आणि ऑफलाइन यादी मध्ये तफावत आहे. मेडिकल ऑफिसर डॉक्टर तोसिफ अहमद यांचे ऑनलाईन यादी मध्ये नाव नाही आणि ऑफलाइन यादी मध्ये पेनाने लिहिलेले आहे. अर्जदारांचे नाव व डीडी व चलन मधील नाव यामध्ये तफावत आहे. अपात्र उमेदवारांचे संचिकामध्ये डिग्री सर्टिफिकेट उपलब्ध नाही. समितीमध्ये आरोग्य विस्तार अधिकारी जाधव यांची नियुक्ती नव्हती तरीसुद्धा पात्र अपात्र व निवड यादी मध्ये त्यांचे स्वाक्षरी आहेत. ऑनलाइन पात्र अपात्र यादीमध्ये फक्त तालुका आरोग्य अधिकारी यांचेच स्वाक्षरी आहे आणि ऑफलाइन यादीमध्ये समितीचे सर्व सदस्यांचे स्वाक्षरी आहेत. असे अनेक मुद्द्यावर शेख अमान यांनी पुरावे सादर केले होते. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अभय धानोरकर यांनी सदरील अहवाल सह संचालक अ तांत्रिक मुंबई यांना पुढील उचित कारवाईसाठी पाठविले होते. तक्रारदार यांनी अनेक महिने स्मरणपत्र सादर केले तरीसुद्धा सहसंचालक कारवाई करत नसल्यामुळे शेख अमान यांनी माननीय उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. दिनांक १६ जानेवारी २०२५ रोजी उच्च न्यायालयाने तक्राराची दखल घेऊन मुख्य कार्यकारी अधिकारी यांना तक्रारदार कडून पुरावा मागून त्यावर उचित निर्णय घेण्याचे आदेश पारित केले. आता मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना या प्रकरणात कोणती भूमिका व निर्णय घेतात संपूर्ण तालुक्याचा लक्ष त्याकडे आहे.
What's Your Reaction?






