बुरहानी इंग्लिश शाळेत प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

बुरहानी इंग्लिश शाळेत प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा आज, 26 जानेवारी 2025 रोजी, शाळेत प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा करण्यात आला. सकाळी 7: 40 वाजता कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रध्वज वंदनाने झाली. बुऱ्हानी इंग्लिश स्कूलचे उपाध्यक्ष शेख साद यांनी ध्वजारोहण केले आणि उपस्थित सर्व विद्यार्थ्यांनी, शिक्षकांनी व पालकांनी राष्ट्रगीत गायले.  ध्वजारोहनाच्या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून बुऱ्हानी इंग्लिश स्कूलचे चेअरमेन शेख मुजिबोद्दीन हाफिजोद्दीन, दर्गा हद्दे कला अध्यक्ष एजाज अहेमद,  हाफिज फैझान, शेख रियाझोद्दिन आदी उपस्थित होते. यानंतर, विद्यार्थ्यांनी प्रजासत्ताक दिनाच्या महत्त्वावर आधारित सुंदर भाषणे सादर केली. विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची माळही या उत्सवाची शोभा वाढवणारी ठरली. देशभक्तीपर गीते, नृत्य, नाटिका आणि कवितांच्या सादरीकरणामुळे संपूर्ण वातावरण देशभक्तीने भारले गेले होते.   कार्यक्रमाच्या शेवटी, शाळेच्या मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांना प्रजासत्ताक दिनाचे महत्त्व समजावून सांगितले आणि देशासाठी कर्तव्यनिष्ठ राहण्याचा संदेश दिला. संपूर्ण शाळा देशभक्तीच्या रंगाने न्हालेली दिसत होती आणि या उत्सवाने सर्वांमध्ये राष्ट्रप्रेमाची भावना अधिक दृढ केली.   कार्यक्रमाच्या यशस्वीेतेसाठी शाळेच्या मुख्यध्यापिका रशिका खान , तसेच  शहाजहाँ, फिरदोस, समरीन, अक्सा , अल्मास , फराह, सुनंदा , अल्फीया, रुबी,  तौहीद आदींनी  मेहनत घेतली.

Jan 27, 2025 - 00:31
Jan 27, 2025 - 01:03
 0
بابا برہان اردو ہائی سکول خلد آباد
2 / 2

2. بابا برہان اردو ہائی سکول خلد آباد

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow