बस अभावी प्रवाशांची गैरसोय

बस अभावी प्रवाशांची गैरसोय मुजीब खान ‌कन्नड प्रतिनिधी ____________________________ कन्नड आगाराच्या बसेस मध्ये नियमितता नसल्याने औरंगाबाद बस स्थानकातून कन्नड येथे परतण्यासाठी सायंकाळच्या वेळी प्रवाशांची मोठी फरपट होते तसेच इतर आगाराच्या बसेस देखील थांबत नसल्याने दैनंदिन प्रवाशांना बस स्थानकावर ताटकळत बसावे लागते त्यामुळे नियोजित पद्धतीने बसेस सोडाव्यात अशी मागणी प्रवाशांनी यांनी केली आहे शाळा महाविद्यालयीन विद्यार्थी सरकारी खाजगी कर्मचारी व्यावसायिक शासकीय अथवा इतर कामांसाठी कन्नड औरंगाबाद दरम्यान प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठी आहे सर्व काम आटोपून सायंकाळी सहाच्या सुमारास परतीच्या प्रवासासाठी येणाऱ्यांची संख्याही अधिक असते नेमक्या याच वेळी बसेस मिळत नाही बसेस मिळेल तरी परराज्यातील किंवा लांब पल्ल्याच्या असल्याने त्यांच्या जागा पूर्वीच आरक्षित असतात त्यामुळे सायंकाळी सहा ते आठ या वेळेत वेट अँड वाचची भूमिका घेत ताटकळत बसावे लागते पासधारकांची कुचंबना दैनंदिन प्रवास करण्या पैकी अनेकांचे पासेस आहेत लांब पल्ल्याच्या अथवा इतर आकाराच्या बसेस मध्ये त्यांना प्रवेश नाकारण्यात येतो त्यामुळे कन्नड आघाडीच्या बसेस शिवाय पर्याय नसल्याने पास धारकांची कुंचुंबना होते वृद्ध महिला रुग्णांची हेळसांड वृद्ध महिला रुग्ण आणि बालकांस प्रवास करणाऱ्यांची हेळसांड होते प्रवाशांची संख्या अधिक असल्यामुळे एखादी बस आल्यास जागा मिळवण्यासाठी एकच झुंपड उडते अशा वेळी महिला वृद्ध आणि रुग्णांना जागा मिळत नाही एकाच वेळी गर्दी होत असल्याने तू तू मै मै चा प्रकार नित्याचा झाला आहे गर्दीमुळे महिलांच्या जवळील वस्तू अथवा अंगावरील दागिने दागिने लंपास होण्याचे घटना घडतच आहेत महिलांजवळील सामान लहान मुले यास गर्दीचा सामना करत बसेस मध्ये प्रवेश मिळवणे कठीण होते एका तासाच्या प्रवासासाठी एक तास वेटिंग ने बसेस सोडल्या जातात या मधल्या वेळेत एखाद्या लांब पल्ल्याच्या बसेस मध्ये जागा मिळाली तर ती बसही कन्नड औरंगाबाद दरम्यान ढाब्याजवळ जेवणासाठी थांबते बस थांबल्यानंतर कन्नडच्या प्रवाशांना अर्धा पाहून तास ताटकळत थांबावे लागते एकूणच एक तासाच्या प्रवासासाठी अर्धा ते एक तास वेटिंग करावी लागते त्यानंतर बस अनेक थांबे घेत कन्नड ला पोहोचते त्यातच औरंगाबाद बस स्टॉप वर दोन दोन तास बस लागत नाही

Feb 13, 2025 - 01:10
 0

2.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow