प्रा. अविनाश डोळस यांच्या जयंती निमित्त व्याख्यानाचे आयोजन वासुदेव मुलाटे

दलित साहित्याच्या प्रेरणेतुन ग्रामीण साहित्याची निर्मिती ; वासुदेव मुलाटे प्रा. अविनाश डोळस यांच्या जयंती निमित्त दलित आणि ग्रामीण साहित्याचे अनुबंध या विषयावर व्याख्यान संपन्न छत्रपती संभाजीनगर/प्रतिनिधी - वाङ्मयाची निर्मिती करणे एवढेच साहित्याचे कार्य नाही. कारण साहित्याचा थेट संबंध मानवी जीवनातील वास्तवाशी आहे. दलित साहित्य हे केवळ वाङ्मयापुरते मर्यादित नव्हते तर या साहित्याने मानवी हक्क आणि न्यायाची, अधिकाराची मांडणी करून समाजामध्ये मानवी मूल्य रुजवण्याचे काम केले आहे. फुले-आंबेडकरी विचारधारेतुन दलित साहित्य निर्माण झाले असून दलित साहित्याच्या प्रेरणेतुनच ग्रामीण साहित्याची निर्मिती झाली असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक, विचारवंत तथा समीक्षक डॉ. वासुदेव मुलाटे यांनी केले. ते (ता. ११ डिसेंबर) स्थानिक सम्राट अशोका हॉल, पिईएस इंजिनिअरिंग कॉलेज, नागसेनवन येथे प्रा. अविनाश डोळस फाउंडेशनच्या वतीने प्रा. अविनाश डोळस यांच्या जयंती निमित्त आयोजित 'दलित आणि ग्रामीण साहित्याचे अनुबंध' या विषयावर आयोजित व्याख्यानातून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी फाउंडेशनचे अध्यक्ष प्राचार्य संजय मुन हे होते. विचारमंचावर जॅकलिन डोळस उपस्थित होत्या. पुढे बोलताना मुलाटे म्हणाले की, ज्या प्रमाणे दलित साहित्याला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अधिष्ठान आहे, त्याचप्रमाणे ग्रामीण साहित्याचे महात्मा फुले हे अधिष्ठान आहेत. दोन्ही चळवळीचा मार्ग जरी वेगळा वाटत असला तरी उद्देश माणसाला प्रतिष्ठा प्रदान करणारा आहे. त्यामुळेच प्रस्थापित मराठी साहित्याने दलित आणि ग्रामीण साहित्याला नाकारले आहे, परंतु तरीही ही चळवळ डगमगलेली नाही. अविनाश डोळस यांच्यासारख्या अनेक लेखकांनी दलित आणि ग्रामीण साहित्य निर्मितीसाठी आणि या साहित्य चळवळीच्या एकूण रुजवणुकीसाठी आपले भरीव असे योगदान दिले आहे. अध्यक्षीय समारोप करताना डॉ. मुन म्हणाले की, दलित साहित्याबरोबरच ग्रामीण साहित्य निर्मितीमध्ये प्रा. अविनाश डोळस यांचे महत्त्वाचे योगदान आहे. डोळस सरांनी दलित आणि ग्रामीण साहित्य चळवळीची चौकट बाजूला सारून त्यांच्यामध्ये सुसंवाद घडवून आणला होता. हा सुसंवाद आता पूर्णपणे बंद होत असून पुन्हा नव्याने हा सुसंवाद साधण्याची गरज आहे. प्रास्ताविक डॉ. प्रज्ञा साळवे यांनी केले. सूत्रसंचालन अमरदीप वानखडे यांनी केले तर आभार अनिल खडतरे यांनी मानले. यावेळी कॉ. भीमराव बनसोड, प्रा. भारत सिरसाट, डॉ. किशोर साळवे, अभय टाकसाळ, कवी ना. तू. पोघे, सिद्धार्थ आलटे, मधुकर खंदारे, राजेश शेगावकर, बोधाचार्य व्ही. के. वाघ, रतनकुमार साळवे, मंगल मुन, भीमराव गाडेकर आदींसह नागरिक उपस्थित होते.

Dec 13, 2024 - 00:52
Dec 13, 2024 - 00:56
 0
1 / 1

1.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow

Er.M.A. Shakeel Senior Journalist,Social and Political activist Sportsman,Singer.District VicePresident Human Right Council of India.