निजाम काळातली जुनी कोर्ट इमारत कन्नड या जागेवर नवीन कोर्ट तयार होत आहेकन्नड न्यायमंदिर नूतन इमारत लवकरच जनतेच्या सेवेत

मुजीब खान कन्नड : कन्नड न्यायालयाची नूतन इमारत लवकरच जनतेला न्यायदान करण्या साठी तयार होत आहे. सदरील इमारत ही तळमजल्यासह वरील तीन मजले अशी अद्यावत सर्व सुविधांसह कन्नड तालुक्यातील पक्षकारांच्या सेवेत उपलब्ध होत आहे. अशी माहिती कन्नड वकील संघाचे अध्यक्ष ॲड. कृष्णा पाटील जाधव यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. दिनांक:२० मार्च २०२४ रोजी मुंबई उच्च न्यायालय, खंडपीठ, औरंगाबादचे मुख्य न्यायमूर्ती मा. रविंद्रजी घुगे साहेब यांचे शुभ हस्ते व सहन्यायमूर्ती. देशमुख यांचे उपस्थितीत नूतन इमारतीचे शिलापूजन करण्यात आले होते, सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक कन्नड वकील संघाचे अध्यक्ष जेष्ठ वकील ॲड .कृष्णा पाटील जाधव यांनी केले, त्यांनी त्यांच्या प्रास्ताविकात माननीय न्यायमूर्ती समोर दिवानी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर व अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश या पदांची निर्मिती कन्नड न्यायालयात व्हावी, अशी जोरदार मागणी केली, त्यावेळी व्यासपीठावर कन्नड न्यायालयाचे तत्कालीन मुख्य न्यायाधीश, श्रीयुत कोळसे देखील उपस्थित होते. अत्यंत भव्य दिव्य असा हा कार्यक्रम झाला. गेल्या आठ महिन्यापासून रात्रंदिवस या इमारतीचे बांधकाम सुरू आहे. कन्नड न्यायालयाच्या जुने इमारतीच्या पाच एकर विस्तीर्ण परिसरामध्ये ८० x ५० स्क्वेअर मीटर एवढ्या जागेमध्ये या नूतन इमारतीचे बांधकाम होणार असून तळमजला व त्यावर तीन मजले असे एकूण चार मजल्याचे बांधकाम होणार असून तळमजल्यावर पार्किंगची व्यवस्था, पक्षकारांचे वाहनाची स्वतंत्र पार्किंग, वकिलांचे वाहनांची स्वतंत्र पार्किंग, तसेच न्यायाधीश महोदयांची वाहनाची स्वतंत्र पार्किंग तसेच न्यायाधीश महोदयांच्या जाण्या येण्यासाठी स्वतंत्र लिफ्ट( उदवाहन) ची सुविधा करण्यात आलेली आहे. पहिल्या मजल्यावर पुरुष वकील संघ व महिला वकील संघ तसेच स्वतंत्र स्वच्छतागृहाची व्यवस्था , त्याचप्रमाणे मीटिंग हॉल तसेच साक्षीदारांसाठी बैठक व्यवस्था इत्यादीची सुद्धा व्यवस्था करण्यात आलेली आहे. प्रस्तावित इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर कोर्ट हॉल, प्रशासकीय हॉल, लोक अदालत हॉल, संगणक रूम, न्यायाधीश महोदयांचे चेंबर्स, रेकॉर्ड रूम आणि ग्रंथालयाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. तसेच प्रस्तावित इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर कोर्ट हॉल, न्यायाधीश महोदयांचे चेंबर, रेकॉर्ड रूम, साक्षीदारांसाठी बैठक व्यवस्था, मेडिटेशन रूम इत्यादीची व्यवस्था करण्यात आलेली आहे. सदर कामावर सुमारे २०० मजूर रात्रंदिवस काम करीत आहे. आजमित्तीस तळ मजला व पहिल्या मजल्याचे स्लॅब चे काम पूर्ण झाले असून दुसऱ्या मजल्याचे काम प्रगतीपथावर आहे. यासाठी एम- ३० काँक्रीट ग्रेड व डिझाईन प्रमाणे ५५० प्रतीचे गज वापरण्यात येत आहेत. तळमजल्यासह वरील तीन मजल्याचे संपूर्ण बांधकाम हे सुमारे एक लाख स्क्वेअर फुटाचे आहे. अशा या भव्य, अद्यावत व विस्तीर्ण अशा न्यायालय इमारतीसाठी कन्नड वकील संघाच्या वतीने अनेक दिवसापासून पाठपुरावा व प्रयत्न करण्यात आले होते.. या संदर्भात उच्च न्यायालय , खंडपीठ ,औरंगाबाद,मुख्य न्यायमूर्ती आदरणीय . संजय गंगापूर वाला तसेच बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र व गोवा चे प्रतिनिधी अँड .वसंतराव साळुंखे यांचे विशेष प्रयत्नाने ही इमारत मंजूर झाली असून त्यासाठी आदरणीय संजय गंगापूर वाला मंत्रालयातील संबंधित अधिकारी, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, सार्वजनिक बांधकाम खात्याचे कार्यकारी अभियंता या सर्वांची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मीटिंग आयोजित करून त्या सर्वांना आवश्यक त्या सूचना व मार्गदर्शन करून या न्यायालयाची प्रस्तावित इमारत तात्काळ मंजूर करण्यासंबंधी आदेशित केले. संबंधित इमारत तयार होण्यासाठी महाराष्ट्र शासनाने सुमारे ४७ कोटी रुपये मंजूर केले तसेच जुनी इमारत पाडून नवीन ठिकाणी तात्पुरती व्यवस्था म्हणून जिल्हा परिषद, प्राथमिक शाळा, सरस्वती कॉलनी ही इमारत ताब्यात घेऊन तेथे न्यायालयीन व्यवस्था करण्यासाठी सुमारे ४७ लाख रुपयांचा निधी मंजूर केला आणि त्याप्रमाणे संबंधित इमारत ताब्यात घेऊन त्या ठिकाणी सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या व त्या ठिकाणी आज तात्पुरत्या स्वरूपात न्यायालयीन व्यवस्था करण्यात आलेली आहे, सोबतच तात्पुरत्या स्वरूपात न्यायालय चालू असलेल्या ठिकाणी, केंद्रीय मंत्री भागवत कराड यांच्या निधीतून दहा लक्ष रुपयांचे शेड बांधून त्याचा वापर ऊन, वारा, पावसापासून बचावासाठी करण्यात येत आहे. नवीन एन. के. कन्स्ट्रक्शनस, औरंगाबाद या कंपनीस कामाचे कंत्राट देण्यात आले असून सदर कंपनीचे प्रोजेक्ट इंजिनियर अन्सारी हे सदरील कामाची देखरेख करत असून या कामावर सार्वजनिक बांधकाम खात्याचे कन्नडचे अभियंता प्रवीण हिवाळे तसेच डेप्युटी इंजिनिअर श्री. येरणे हे करीत असून यापूर्वी कन्नड न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश पी. एम. कोळसे साहेब व आताचे न्यायमूर्ती . वि. द. पाटील तसेच कन्नड वकील संघाचे सर्व सन्माननीय सदस्य वारंवार व वेळोवेळी भेट देऊन कामाची पाहणी करीत असून सदरील काम योग्य पद्धतीने व अत्यंत दर्जेदारपणे व्हावे, यासाठी पूर्ण दक्षतेने काळजी घेत आहेत. सदरील इमारतीच्या बांधकामाचा कालावधी हा दोन वर्षाचा असून सदरील इमारत २०२६जनतेच्या न्यायदानासाठी तयार होऊन उपलब्ध राहील... अशी माहिती कन्नड वकील संघाचे अध्यक्ष ॲड. कृष्णा पाटील जाधव यांनी दिली.

Dec 29, 2024 - 20:18
Dec 29, 2024 - 23:59
 0

2.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow