युरिया खताची जादा दराने विक्री भरारी पथकाची धडक कारवाई केली

मुजीब खान कन्नड : कन्नड तालुका मोजे नाचनवेल, परिसरात युरिया खताची जादा दराने विक्री होत असल्याबाबतच्या शेतकऱ्यांच्या तक्रारी कृषी विभागास प्राप्त झाल्या होत्या त्या अनुषंगाने आज दिनांक २८/ २०२४ रोजी कृषी विभाग राज्य शासन व जिल्हा परिषद यांच्या जिल्हास्तरीय भरारी पथकाने धडक कारवाई केली. नम्रता फर्टीलायझर्स नाचनवेल येथे डमी ग्राहक पाठवून युरिया खताची मागणी करण्यात आली. नम्रता फर्टिलायझर्स कृषी सेवा केंद्राचे कर्मचारी प्रमोद सूर्यभान काळे यांनी कृभको कंपनीच्या युरिया खताच्या गोणीची विक्री तीनशे रुपये प्रति गोणी याप्रमाणे दोन गोण्यासाठी सहाशे रुपये घेऊन केली. युरिया खताच्या गोणीची मूळ किंमत २६६ रुपये आहे. दोन गोण्या साठी लागणारे ६०० रुपये कृषी सेवा केंद्राचे प्रतिनिधी यांनी फोन पे द्वारे स्वीकारली व ग्राहकास २६६ रुपये प्रति गोणी याप्रमाणे कच्ची पावती दिली. याबाबत रीतसर पंचनामा करण्यात आला व कृषीसेवा केंद्राची तपासणी करून खताच्या साठ्यास विक्री बंद आदेश देण्यात आले. तपासणी दरम्यान स्टॉक बुक अद्ययावत नसणे इ पॉस व प्रत्यक्ष साठा न जुळणे, दर्शनी भागात भाव फलक न लावणे इत्यादी त्रुटी ही आढळून आल्या याबाबत सदरील कृषी सेवा केंद्रास नोटीस बजावण्यात आली आहे व कारवाईचा प्रस्ताव परवाना अधिकारी तथा जिल्हाधिक्षक कृषी अधिकारी, छत्रपती संभाजी नगर यांचेकडे पाठविण्यात आला आहे. सदरील कारवाई प्रकाश पाटील कृषी विकास अधिकारी, जिल्हा परिषद, छत्रपती संभाजी नगर, पी. ए. ताजने, मोहीम अधिकारी, जिल्हा परिषद, छत्रपती संभाजीनगर, एस. जी. बंडगर विभागीय गुणवत्ता नियंत्रण, निरीक्षक छत्रपती संभाजीनगर, एच. आर. बोयनर कृषी अधिकारी, पंचायत समिती, कन्नड यांनी टी. एस. मोटे, विभागीय कृषी सहसंचालक छत्रपती संभाजी नगर, प्रकाश देशमुख

Dec 29, 2024 - 22:46
Dec 29, 2024 - 22:45
 0

1.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow