जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांना बालस्नेही पुरस्कार जाहीर;

जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांना बालस्नेही पुरस्कार जाहीर;दि.३ मार्चला मुंबई येथे पुरस्कार वितरण छत्रपती संभाजीनगर,दि.२४(जिमाका)- महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाच्या वतीने जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी बालस्नेही पुरस्कारासाठी निवड झाली असे आयोगाच्या अध्यक्ष ॲड.सुशीबेन शाह यांनी एका पत्राद्वारे कळविले आहे. उत्कृष्ट जिल्हाधिकारी या नामांकनात छत्रपती संभाजीनगर विभागातून निवड करण्यात आल्याचेही कळविण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाच्या वतीएन बालस्नेही पुरस्कार २०२४ साठी उत्कृष्ट जिल्हाधिकारी या नामांकनात जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी निवड झाली आहे.सोमवार दि.३ मार्च रोजी दुपारी एक वा. यशवंतराव चव्हाण सेंटर मुंबई येथे हा पुरस्कार वितरण सोहळा होणार असून त्यासाठी जिल्हाधिकारी स्वामी यांना निमंत्रणही आले आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे,राज्यमंत्री योगेश कदम, मेघना बोर्डीकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी बालकांच्या हक्कांचे संरक्षण होण्याच्या दृष्टीने त्यांच्या प्रशासकीय कारकीर्दीत राबविलेल्या विविध उपक्रमांच्या यशस्वीतेमुळे त्यांची ह्या पुरस्कारासाठी निवड झाली आहे. शाळा बाह्य मुलांचे सर्व्हेक्षण करुन त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात पुन्हा आणणे, वीट भट्ट्यांवरील कामगारांच्या मुलांच्या शिक्षणासाठी उपाययोजना करणे, बालकामगारांचा शोध घेऊन त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणे, बालमृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी प्रभावी उपाययोज्ना राबविणे, कुपोषण निर्मूलनासाठी दत्तक बालश्रेणी वर्धन योजना राबवून त्यात कुपोषित बालकांचे पालकत्व देण्यात आले. त्यात ४८०० बालकांचे श्रेणीवर्धन झाले. माझे मुल माझी जबाबदारी हे अभियान राबवून मुलांच्या आरोग्याच्या सातबारा तयार केला. याशिवाय आता जिल्हाधिकारी छत्रपती संभाजीनगर म्हणून शालेय विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता व सर्वांगिण विकासासाठी त्यांनी दशसूत्री सारखा उपक्रम राबविला आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांची बालस्नेही पुरस्कारासाठी निवड झाली आहे.

Feb 24, 2025 - 20:42
 0
राष्ट्रसंत गाडगे महाराज यांच्या जयंती
2 / 3

2. राष्ट्रसंत गाडगे महाराज यांच्या जयंती

राष्ट्रसंत गाडगे महाराज यांच्या जयंती" निमित्त स्वच्छता सर्वेक्षण 2025 विशेष प्रचार कार्यक्रम उत्साहात संपन्न.

स्वच्छता सर्वेक्षण 2025 विषयावर विशेष मुलांची चित्रकला स्पर्धा संपन्न. 

दिनांक : 24/02/2025, 

भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालय, केंद्रीय संचार ब्यूरो, छ. संभाजीनगर व नवजीवन सोसायटी फॉर रिसर्च अँड रिहॅबिलिटेशन ऑफ मेन्टली हँडिकॅप्ड ,छत्रपती संभाजीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने तर्फे नवाजीवन मतिमंद मुलांची शाळा व संरक्षित कार्यशाळा, चिकलठाणा, छत्रपती संभाजीनगर येथे "राष्ट्रसंत गाडगे महाराज जयंती" निमित्त स्वच्छ सर्वेक्षण 2025 विषयावर विशेष प्रचार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी संस्थेच्या अध्यक्षा, शर्मिला गांधी, अधीक्षक, अभिजीत जोशी, केंद्रीय संचार ब्युरो, छत्रपती संभाजीनगरचे सहा. क्षेत्रीय प्रचार अधिकारी, प्रदीप पवार, सुजाता जोशी, संध्या मरेवाड आणि शाळेचे सर्व शिक्षक वर्ग व विध्यार्थी उपस्थित होते. 

कार्यक्रमाच्या सुरुवातीला विशेष मुलांनी चित्रकला स्पर्धेत भाग घेतला व चित्र रंगवली. शिला तुमराव यांनी सुत्रसंचालन केले. प्रदीप पवार यांनी आपल्या प्रस्ताविकातून कार्यालय आणि स्वच्छता सर्वेक्षण 2025 ची रूपरेषा सांगितली व आभार व्यक्त केले. चित्रकला स्पर्धेतील विजेते विशेष विद्यार्थी वेदांत इंगळे, अभिषेक शिंदे, शुभंकर, महेश मिरगणे आणि गौरव सुरडकर यांना पारितोषिक देऊन गौरवण्यात आले. कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांनी एकत्र स्वच्छतेची शपथ घेतली. 

कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता केंद्रीय संचार ब्यूरो व नवजीवन सोसायटी फॉर रिसर्च अँड रिहॅबिलिटेशन ऑफ मेन्टली हँडिकॅप्ड,छत्रपती संभाजीनगर च्या कर्मचाऱ्यांनी यांनी विशेष परिश्रम घेतले.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow