केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचे आगमन व स्वागत

छत्रपती संभाजीनगर, दि.१८(जिमाका)- केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचे आज दुपारी ४ व. २० मि. नी विमानाने आगमन झाले. प्रशासनातर्फे त्यांचे स्वागत करण्यात आले. या प्रसंगी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सामाजिक न्याय मंत्री तथा पालकमंत्री संजय शिरसाट, इमाव कल्याण मंत्री अतुल सावे, पणन मंत्री जयकुमार रावल, राज्यसभा सदस्य खा. डॉ. भागवत कराड,खा. संदीपान भुमरे,आ. प्रशांत बंब,आ. अनुराधाताई चव्हाण, आ. नारायण कुचे,आ. संजय केणेकर तसेच विभागीय आयुक्त दिलीप गावडे, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित, छत्रपती संभाजीनगर परीक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्र, पोलीस आयुक्त प्रवीण पवार, पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड उपस्थित होते.

Apr 18, 2025 - 21:33
Apr 18, 2025 - 21:36
 0
Arrival and welcome of Union Defence Minister Rajnath Singh
1 / 2

1. Arrival and welcome of Union Defence Minister Rajnath Singh

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow