शासकीय कर्करोग रुग्णालयातील ट्रू बीम लिनियर ॲक्सलरेटर उपचार प्रणालीचे लोकार्पण

शासकीय कर्करोग रुग्णालयातील ट्रू बीम लिनियर ॲक्सलरेटर उपचार प्रणालीचे लोकार्पण छत्रपती संभाजीनगर, दि.२७ (प्रतिनिधि)- येथील शासकीय कर्करोग रुग्णालयातील ट्रू बीम युनिट या कर्करोगावरील अतिविशेष उपचार देणाऱ्या अत्याधुनिक यंत्र प्रणालीचे व कर्करोग संस्थेच्या विस्तारीत भागाचे लोकार्पण आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच केंद्रीय आरोग्य,कुटुंब कल्याण व रसायने आणि खते मंत्री जगत प्रकाश नड्डा यांच्या हस्ते करण्यात आले. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, इमाव कल्याण मंत्री अतुल सावे, राज्यसभा सदस्य खा. डॉ. भागवत कराड, खा. संदिपान भुमरे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, आ. सतिष चव्हाण, आ. नारायण कुचे, आ. अनुराधा चव्हाण, आ. संजना जाधव यांचीही यावेळी उपस्थिती होती. तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे, राज्य कर्करोग रुग्णालयाचे विशेष कार्य अधिकारी डॉ. अरविंद गायकवाड, वैद्यकीय अधीक्षक डॉ. दर्पण जक्कल, वैद्यकिय शिक्षण आयुक्त राजीव निवतकर, संचालक डॉ. अजय चंदनवाले तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते. त्यांनी मान्यवरांना यंत्रप्रणालीची माहिती दिली. राज्य कर्करोग संस्थेच्या विस्तारीकरणाचेही लोकार्पण यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

Apr 27, 2025 - 22:42
 0
1 / 1

1.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow

Er.M.A. Shakeel Senior Journalist,Social and Political activist Sportsman,Singer.District VicePresident Human Right Council of India.