विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांनी केली जायकवाडी समांतर पाणी पुरवठा योजनेच्या कामाची पाहणी
विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांनी केली जायकवाडी समांतर पाणी पुरवठा योजनेच्या कामाची पाहणी छत्रपती संभाजीनगर, दि.19 एप्रिल, (प्रतिनिधि) : विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांनी शहराला पाणी पुरवठा करण्यात येणाऱ्या जायकवाडी समांतर पाणी पुरवठा योजनेच्या कामाची पाहणी केली. जॅकवेलचे काम अपूर्ण असल्याचे विभागीय आयुक्त श्री. गावडे यांच्या निदर्शनास आले. यावेळी त्यांनी अडचण जाणून घेतली. मजूर कमतरता व उंची वाढल्यामुळे मजूरांना काम करण्यास अडचण येत असल्याची बाबही निदर्शनास आली. याबाबत मजुरांची संख्या वाढवणे, 200 एमएलडी पाणी पुरवठा करण्यासाठी आवश्यक भाग प्रथम पूर्ण करणे, 27 मीटर पैकी 24 मीटर पूर्ण असून, उर्वरित 3 मीटर प्राधान्याने पूर्ण करणे, जॅकवेलच्या तिन्ही बाजूने माती भरुन घेऊन ग्राऊंड लेवल पर्यंत भराव करावा जेणे करून कामगारांना सुरक्षितपणे काम करता येईल असे निर्देश विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांनी दिले. जॅकवेलच्या तिन्ही बाजूने माती भरण्यासाठी जमीन उपलब्ध करून देण्यासंदर्भात जलसंपदा विभागाची शोधलेली जागा योग्य नसल्याची अडचण विचारात घेत जी जागा निश्चित केली होती त्या ठिकाणी कर्मचाऱ्यांचा रहिवास असल्याने व सदर जागा वन्यजीव अभयारण्य संरक्षित असल्याने जलसंपदा विभागाने बंदी कारागृहासाठी दिलेल्या जागेपैकी उचित एक ठिकाण तिन्ही विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी करून निश्चित करण्याबाबतचा निर्णय यावेळी घेण्यात आला. अप्रोच पुलाबाबतचे 18 मीटरचे काम बाकी असून ते एक महिन्यात पूर्ण करा व 1200 मीमी पाईपलाईनसाठी चेअर लवकरात लवकर टाका अशा उपाययोजना यावेळी सुचविण्या आल्या. बटरफ्लाय वॉल्व बसविण्याबाबत असलेल्या अडचणींचा आढावा घेतला त्यावेळी 8 ठिकाणी गेवराई तांडा, आरएल स्टील, फारोळा पूल, पेरे पंप, महाकाल जिम, योग हॉटेल, दाल मिल पूल, साखर कारखान्याजवळ, 900 मीमी व 1200 मीमीची पाईपलाईन 2500 मीमीला लागून येत असल्याने तेथे बटरफ्लाय वॉल्व बसविता येत नसल्याची बाब पुढ आली त्यावर आहे त्या परिस्थितीत विशेष काळजी घेऊन जेथे बटरफ्लाय व्हॉल्व बसविणे शक्य आहे तेथे तेथे बसविणे व इतर ठिकाणी 900 मीमी किंवा 1200 मीमी पाईपलाईन बाबत तांत्रिक दृष्ट्या योग्य पर्याय स्वीकारून बटरफ्लाय व्हॉल्व बसविण्याबाबतचे निर्देशही यावेळी देण्यात आले. 10 ठिकाणी 2500 मीमी लाईन टाकता येत नसल्याबाबत विचारले असता यावर दादाजी हॉटेल, ढोरकीण, पांगराफाटा, चितेगाव, जिल्हा परिषद शाळा, नक्षत्रवाडी, डब्ल्यूटीपी, डीएमआयसीगेट, कौडगाव पूल, साईलीला हॉटेल, सागर दर्शन इमारत, फारोळा नाला अशा 10 ठिकाणी 900 मीमी व 1200 मीमी पाईपलाईन ही 2500 मीमी पाईपलाईनला अगदी लगत येत असल्यामुळे 2500 मीमी पाईपलाईन टाकता येत नसल्याची अडचण सांगण्यात आली त्यावर 900 मीमी व 1200 मीमी पाईपलाईनबाबत तांत्रिक दृष्ट्या योग्य पर्याय स्वीकारून 2500 मीमी पाईपलाईचे काम पूर्ण करण्याबाबत महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाने कार्यवाही करावी असे निर्देश विभागीय आयुक्त श्री.गावडे यांनी दिले. वॉटर शटडाऊन घेण्याबाबतचा मुद्दा उपस्थित झाल्यानंतर 25 ठिकाणी तुकड्यात अपूर्ण असणारे पाईपलाईनचे काम करण्यासाठी महानगरपालिकेची चालू असलेली पाईपलाईन बंद करून काम पूर्ण करावे लागणार आहे. मात्र उन्हाळा सुरू असल्याने व मुळातच शहराला कमी पाणीपुरवठा होत असल्याने मोठ्या कालावधीचा शटडाऊन देणे शक्य होत नाही. हीच बाब विचारात घेत महानगरपालिकेने 3 दिवसांचा शटडाऊन देण्याचे मान्य केले, व या काळात महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व कंत्राटदार यांनी सर्व ठिकाणचे सुक्ष्म नियोजन करून काम पूर्ण करावे. पुन्हा पुन्हा शटडाऊन देणे शक्य होणार नाही असे महापालिकेकडून सांगण्यात आले. त्यास महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि ठेकेदार यांनी संमती दर्शविली, त्यामुळे सूक्ष्म आणि पक्के नियोजन करून काम पूर्ण करण्याचे निर्देश दिले ढोरकीण व चितेगाव या ठिकाणी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभाग यांनी पुलाचे काम अपूर्ण असल्याने या ठिकाणी 2500 मीमीची पाईपलाईन अंथरता येत नाही अशी अडचण सांगितली गेली या अडचणीबाबत भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाने तातडीने या पुलाचे कामकाज पूर्ण करावे अशा सूचना विभागीय आयुक्त श्री.गावडे यांनी दिल्या. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडूनही याबाबत तत्परतेने कार्यवाही करण्यात येईल असे सांगण्यात आले. निसर्ग नर्सरी, व्हिडिओकॉन कंपनी, हनुमान मंदिर, साई मंदिर, देवगिरी हुरडा, मोहटा देवी, योग हॉटेल, दालमिल पूल या ठिकाणी हायड्रो टेस्टींग अद्याप पूर्ण झालेले नाही असे निदर्शनास आणले गेले . या सर्व ठिकाणी हायड्रो टेस्टींग पुढील 45 दिवसांत पूर्ण करा असे निर्देश विभागीय आयुक्त श्री.गावडे यांनी दिले. एकूण 95 एअर वाल्व्ह बसवावयाचे आहेत. यापैकी 56 एअर वाल्व्हचे स्टेम उभे केले आहेत. उर्वरित 39 वाल्व्हचे काम अद्याप सुरू नाही ते तातडीने बसवा अशा सूचना विभागीय आयुक्तांनी दिल्या. एकूण 8 स्कोअर वॉल्व्ह बसाववायचे आहेत. त्यांचे काम अद्याप सुरू नाही, ते सुरू करा असे निर्देशही विभागीय आयुक्तांनी दिले. 53 इएसआरचा विषयाबाबत आढावा घेतला त्यावेळी मूळ आराखड्यात 53 इएसआर चा समावेश होता, तद्नंतर यापैकी 3 टाक्या रद्द करण्यात आल्या आहेत. उर्वरित 50 टाक्यापैकी 7 महानगरपालिकेला वर्ग केल्या असून 10 टाक्याचे काम पूर्णत्वाच्या टप्प्यावर आहे. एकूण 50 टाक्यांपैकी 43 टाक्यांचे काम विविध टप्प्यावर सुरू असुन ते पूर्ण करा तसेच विजेच्या कामाबाबत निविदा प्रक्रिया कार्यादेश देण्याच्या टप्प्यावर असल्याचे सांगितले गेले त्यावर तातडीने प्रक्रिया पूर्ण करा असे निर्देशही श्री.गावडे यांनी यावेळी दिले. यावेळी त्यांच्यासोबत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या मुख्य अभियंता मनीषा पलांडे, अधीक्षक अभियंता दीपक कोळी,कार्यकारी अभियंता किरण पाटील, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाचे प्रकल्प संचालक

1. Divisional Commissioner Dilip Gawde inspected the work of Jayakwadi Parallel Water Supply Scheme
What's Your Reaction?






