वक्फ बोर्ड विधेयक मुस्लिम बांधवांच्या हिताचे संरक्षण करणारे-हेमंत पाटील

वक्फ बोर्ड विधेयक मुस्लिम बांधवांच्या हिताचे संरक्षण करणारे-हेमंत पाटील विरोधकांच्या अपप्रचाराला बळी न पडण्याचे आवाहन पुणे, दिनांक ६ एप्रिल २०२५ (प्रतिनिधि) लोकशाहीचे सर्वोच्च मंदिर असलेल्या लोकसभेत तसेच वरिष्ठ सभागृह 'राज्यसभेत' वक्फ बोर्ड विधेयक मंजूर झाले आहे.राष्ट्रपतींच्या स्वाक्षरी नंतर विधेयकाचे कायद्यात रूपांतर होईल.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारतातील मुस्लिम बांधवांना 'नव उम्मेद' देणारे हे विधेयक त्यांच्या अधिकारांचे संरक्षण करणारे आहे, असे मत यानिमित्ताने इंडिया अगेन्स्ट करप्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि ओबीसी नेते हेमंत पाटील यांनी रविवारी (ता.६) व्यक्त केले आहे. मुस्लिम महिलांचे सक्षमीकरण तसेच सकल मुस्लिम समाजाच्या अधिकारांचे संरक्षण करण्याचा मुख्य उद्देश सरकारचा आहे.विरोधकांनी हे विधेयक मुस्लिम विरोधी असल्याचा अपप्रचार केला.पंरतु, हे विधेयक गरीब, मागासलेले मुस्लिम बांधव आणि त्यांच्या परिवारांच्या विकासाचा मार्ग प्रशस्त आणि सुकर करणारे आहे, असे मत पाटील यांनी व्यक्त केले.यूनीफाईड वक्फ मॅनेजमेंट इम्पावरमेंट इफिशिएंशी अॅन्ड डेव्लपमेंट अर्थात 'उम्मीद' मुस्लिम बांधवांच्या विकासासाठी कटिबद्ध असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या दुरदृष्टीचे प्रतीक आहे. वैज्ञानिक संस्था असलेले वक्फ बोर्ड धर्मनिरपेक्ष असणे आवश्यक आहे. असे असतांनाही केंद्र सरकारने वक्फ बोर्डातील मुस्लिमेतर यांची संख्या मर्यादित ठेवली आहे.विधेयकासंबंधी भ्रामक माहितीचा प्रचार करीत विरोधकांनी मुस्लिम बांधवांना घाबरवण्याचे काम केले असल्याचा आरोप पाटील यांनी केला.मुस्लिम बांधवांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास तसेच प्रेम आहे. केवळ दुष्प्रचार करीत मुस्लिम बांधवांच्या मनात संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा दावा करीत अपप्रचाराला बळी न पाडण्याचे आवाहन पाटील यांनी केले आहे.

Apr 9, 2025 - 22:11
 0
1 / 1

1.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow

Er.M.A. Shakeel Senior Journalist,Social and Political activist Sportsman,Singer.District VicePresident Human Right Council of India.