राज्यस्तरीय 'मूकनायक' पुरस्काराचे रविवारी वितरण सोहळ्यास बहुसंखेने उपस्थित राहा-प्रा.शरद वंजारे
राज्यस्तरीय 'मूकनायक' पुरस्काराचे रविवारी वितरण सोहळ्यास बहुसंखेने उपस्थित राहा-प्रा.शरद वंजारे छत्रपती संभाजीनगर : डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या ' मूकनायक ' या पाक्षिकामागील सामाजिक जाणीव आणि बांधिलकी जपणाऱ्या पत्रकारितेचा वारसा जतन करण्यासाठी मराठवाड्यातील 'शाक्यमुनि प्रतिष्ठानने यंदा राज्यस्तरीय 'मूकनायक पुरस्कार' सुरू केला आहे. पहिल्या वर्षातील या प्रतिष्ठेच्या पुरस्कारासाठी ज्येष्ठ पत्रकार दिवाकर शेजवळ यांची निवड करण्यात आली आहे. रविवारी १६ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी ११ वाजता पी.ई.एस. अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या अशोका हॉल येथे आयोजित कार्यक्रमात दिवाकर शेजवळ यांना राज्यस्तरीय 'मूकनायक पुरस्कार' देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. समारंभाला वडाळा येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर लॉ कॉलेजचे प्राचार्य ॲड. जयमंगल धनराज, ग्रामिण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक अशोक सिरसे, पी.ई.एस.अभियांत्रीकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अभिजित वाडेकर, पत्रकार विजय बहादुरे यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. दिवाकर शेजवळ हे गेली ३५ वर्षे पत्रकारिता करीत असून मुंबई मराठी पत्रकार संघाचे कार्यकारिणी सदस्य आहेत. या पुरस्काराचे स्वरूप २५ हजार रुपये रोख, मानपत्र आणि स्मृतिचिन्ह असे आहे. या निवडीची घोषणा नुकतीच छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या बैठकीनंतर 'शाक्यमुनि प्रतिष्ठान' चे अध्यक्ष प्रा. शरद वंजारे, उपाध्यक्ष प्रा.दिपक जमधाडे आणि सचिव प्रा. डॉ. संजय कांबळे यांनी एका पत्रकाद्वारे केली आहे. या बैठकीला सारीका वाघमारे, किशोरी मस्के, उज्वल गायकवाड, सिध्दार्थ वाघमारे हे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. तरी या पुरस्कार संमारंभास मराठवाड्यातील बहुजन चळवळीतील विद्यार्थी, युवक-युवती, कर्मचारी,व कार्यकरत्यांनी बहुसंखेने उपस्थित राहावे, असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. दिनांक: १६/०२०२५ वेळ: सकाळी ११ वाजता ठिकाण: अशोक सभागृह, पी.ई.एस. अभियांत्रिकी महाविद्यालय, छत्रपती संभाजीनगर
1.
What's Your Reaction?






