पत्रकारांना छापिलनावाचे पेन भेट देऊन वैचारिक जयंती साजरी केली
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीनिमित्त सामाजिक कार्यकर्ते विरेंद्र सिताराम वाघ यांनी अनोखा पुढाकार घेत पत्रकारांना पेन वाटून जयंती साजरी केली. यातून त्यांनी डॉ.आंबेडकरांनी दिलेले शिक्षण आणि लेखनाचे महत्त्व हा संदेश देण्याचा प्रयत्न केला. समाजात जनजागृती करणाऱ्या पत्रकारांचा गौरव करताना त्यांनी बाबासाहेबांच्या विचारांचे स्मरण करून त्यांचा आदर्श पुढे नेण्याच्या संकल्पाचा पुनरुच्चार केला. या वेळी माजी नगराध्यक्ष रवींद्र ढवळे व सरपंच नितीन जाधव यांच्या हस्ते पत्रकारांना लेखणीचे वाटप करण्यात आले. विरेंद्र वाघ यांच्या या अभिनव उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

1. Journalists were presented with pens from the printed name and celebrated their ideological anniversary.
What's Your Reaction?






