पंतप्रधानांच्या निष्पक्षतेवर देशवासीयांचा विश्वास-हेमंत पाटील

पंतप्रधानांच्या निष्पक्षतेवर देशवासीयांचा विश्वास-हेमंत पाटील पंतप्रधानांच्या निष्पक्षतेवर देशवासीयांचा विश्वास-हेमंत पाटील मतदारसंघ पुनर्रचनेसंबंधी विरोधकांकडून वातावरण तापवण्याचा प्रयत्न मुंबई,२३ मार्च २०२५ (प्रतिनिधि) मतदार संघ पुनर्रचना संदर्भात विरोधकांकडून देशभरात रान पेटवण्याचा प्रयत्न केला जात आहे. देशवासियांमध्ये संभ्रम निर्माण करीत सरकारवर दबाव आणण्याचा मार्ग विरोधकांनी अवलंबला आहे.मात्र,पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात कुठलाही निर्णय निष्पक्षतेने घेतला जाईल.देशवासियांना मोदींवर विश्वास आहे, अशा शब्दात इंडिया अगेन्स्ट करप्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि ओबीसी नेते हेमंत पाटील यांनी विरोधकांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला. मतदार संघ पुनर्रचना मुद्यावर तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के.स्टॅलिन यांनी बोलावलेल्या बैठकीत विरोधी पक्षाच्या नेत्यांनी हजेरी लावली. परंतु, या बैठकीत विरोधकांमधील फूट स्पष्टपणे दिसून आली. महाराष्ट्रातील मुख्य राजकीय पक्ष शिवसेना (उबाठा), एनसीपी (एसपी) सह समाजवादी आणि राष्ट्रीय जनता दलाला बैठकीचे आमंत्रण नव्हते.एकंदरीतप्रस्तावित मतदार संघ पुनर्रचना संदर्भात विरोधकांमध्ये फूट आहे.मतदार संघांची पुनर्रचना काळाची गरज आहे.वाढत्या लोकसंख्येनूसार लोकसभेतील प्रतिनिधित्व वाढवणे आवश्यक असल्याचे पाटील म्हणाले.लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघांची दर दहा वर्षांनी पुनर्रचना करावी, अशी तरतूद राज्यधटनेत आहे.लोकसंख्या त्यासाठीचा मुख्य निकष आहे. २००२ च्या संसदीय कायद्यानूसार २०२६ पर्यंत मतदार संघ पुनर्रचना करण्यात येत नव्हती. २०२६ नंतर पुनर्रचना हेाईल, असे मत पाटील यांनी व्यक्त केले. मतदार संघांच्या पुनर्रचने नंतर लोकसंख्येच्या आधारे दक्षिण भारतातील लोकसभेच्या जागा कमी होतील, अशी भीतीत डीएमके सह इतर पक्षांना आहे.मतदार संघाच्या पुनर्रचने विरोधात नसून निष्पक्ष पुनर्रचनेची मागणी केरळ, कर्नाटक, आंधप्रदेश, तेलंगना, ओडिशा, पश्चिम बंगाल आणि पंजाब मधील निवडक पक्षांची आहे.पंरतु, विद्यमान सरकारच्या कार्यकाळात घेण्यात येणारे निर्णय हे लोकहिताचे आणि निष्पक्षच असतात, याचा या राजकीय पक्षांना विसर पडला असल्याची खंत पाटील यांनी व्यक्त केली. सरकार कडून मतदारसंघ पुनर्रचनेसंदर्भात कुठलेही बाजू समोर आलेली नाही.अशात केवळ संभ्रम निर्माण करण्यासाठी विरोधकांकडून करण्यात येणारे प्रयत्न चिंताजनक असल्याचे पाटील म्हणाले.विविधतेत एकतेचे प्रतिक असलेल्या भारतासारख्या विशालकाय देशात मतदारसंघ पुनर्रचनेनंतर उत्तरेतील जागा वाढतील आणि दक्षिणेतील जागा कमी होती, असा संभ्रम निर्माण करीत तेढ निर्माण करण्याचा कट विरोधकांचा आहे. अशा राजकीय पक्षांचे मनसुबे वेळीच ओळखण्याची गरज असल्याचे मत पाटील यांनी व्यक्त केले.

Mar 24, 2025 - 00:42
 0
1 / 1

1.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow

Er.M.A. Shakeel Senior Journalist,Social and Political activist Sportsman,Singer.District VicePresident Human Right Council of India.