एकनाथ शिंदे यांचा शरद पवार यांच्या हस्ते सत्कार नवी दिल्ली

एकनाथ शिंदे यांचा शरद पवार यांच्या हस्ते सत्कार नवी दिल्ली - नवी दिल्ली येथील ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष शरद पवार यांच्या शुभहस्ते एकनाथ शिंदे यांना 'महादजी शिंदे राष्ट्र गौरव पुरस्कारा'ने सन्मान करण्यात आला. यावेळी या पुरस्काराचा विनम्रपणे स्वीकार करताना या सोहळ्याबद्दल एकनाथ शिंदे यांनी आपले मनोगत व्यक्त केले आहे. महापराक्रमी महादजी शिंदे यांच्या नावाचा पुरस्कार असून या सन्मानापेक्षा हा पुरस्कार मिळाल्यामुळे येणारी जबाबदारीची जाणीव मला आहे असे यासमयी नमूद केले. शरद पवार साहेब यांच्या सारख्या ज्येष्ठ आणि जाणत्या नेत्यांच्या हस्ते हा पुरस्कार मिळणे ही गौरवाची बाब आहे. पवार साहेबांची राजकारणातील गुगलीही कळत नाही, मात्र पवार साहेबांचे आपल्यासोबत चांगले संबध आहेत, त्यामुळे ते मला भविष्यकाळात कधीही गुगली टाकणार नाहीत असे मत यावेळी व्यक्त केले. पानिपतानंतर अवघ्या १० वर्षात महादजी शिंदे यांनी दिल्लीत भगवा फडकवला. महादजी शिंदेंमुळे ब्रिटिशांना भारतात सत्ता काबीज करण्यासाठी तब्बल ५० वर्षे वाट पहावी लागली. त्यामुळेच इंग्रजांनी त्यांना 'दी ग्रेट मराठा' ही पदवी दिली होती असे यासमयी नमूद केले. रणांगणात कामिगिरी फत्ते करणाऱ्या मावळ्यांना सोन्याचे सलकडं देण्याची इतिहासात प्रथा होती. माझ्यासाठी हा पुरस्कार म्हणजे सोन्याचे सलकडंच असल्याची भावना याप्रसंगी व्यक्त केली. माझ्या मराठी मातीचे केलेले कौतुक असून माझ्यासोबत अहोरात्र कष्ट करणाऱ्या लाखो कार्यकर्त्यांचा, लाडक्या बहिणींचा आणि लाडक्या भावांचा हा सन्मान आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि गृहमंत्री अमित भाई शाह आपल्या पाठीशी पहाडासारखे उभे राहिले म्हणून महाराष्ट्रात गेल्या अडीच वर्षात प्रचंड काम करता आले. महादजी शिंदे यांच्या कार्यकर्तृत्वाचा समावेश शालेय अभ्यासक्रमात करण्यात येईल, तसेच कणेरखेड येथे महादजी शिंदे यांच्या राष्ट्रीय स्मारकाबाबत राज्य सरकार नक्की विचार करेल, अशी ग्वाही यासमयी बोलताना दिली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष शरद पवार, केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया, केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे, ज्येष्ठ साहित्यिक सदानंद मोरे, सरहद्द संस्थेचे अध्यक्ष संजय नहार, खासदार डॉ.श्रीकांत शिंदे, खासदार नरेश म्हस्के, माजी खासदार राहुल शेवाळे, एबीपी न्यूजचे संपादक राजीव खांडेकर आणि विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.

Feb 12, 2025 - 18:27
 0
Eknath Shinde felicitated by Sharad Pawar New Delhi
1 / 1

1. Eknath Shinde felicitated by Sharad Pawar New Delhi

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow