मनपाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा आता मनपाच्या शाळा होत आहेत "स्मार्ट स्कुल टू बेस्ट स्कुल"
मनपाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा आता मनपाच्या शाळा होत आहेत "स्मार्ट स्कुल टू बेस्ट स्कुल" महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या संकल्पनेतून मनपाच्या शाळेत स्मार्ट स्कूल टू बेस्ट स्कूल हा प्रकल्प राबविला जात आहे. या प्रकल्पांतर्गत शाळेमध्ये स्मार्ट सिटी अंतर्गत प्रथमतः सर्व भौतिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या. त्यामध्ये शाळा स्मार्ट करणे, वर्ग स्मार्ट करणे, विद्यार्थ्याला बसण्यासाठी चांगले बेंचेस उपलब्ध करण्यात आले, तसेच शाळेमध्ये आम्हाला खेळू द्या या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी ग्राउंड विकसित करून सिंथेटिक टर्फ तयार करण्यात आले आले. त्या मुळे जून 2024 मध्ये मनपाच्या शाळेत प्रवेश फुल झाले पटसंख्या दीड हजार विद्यार्थ्यांनी वाढून आज 17000 विद्यार्थी मनपाच्या शाळेत शिक्षण घेत आहेत. विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढविण्यासाठी सावित्री एज्युकेशन कंट्रोल रूमची स्थापना करण्यात आली. त्यामुळे विद्यार्थी उपस्थिती 10 ते 12 टक्के वाढली आहे आणि आता विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढविण्यासाठी गुणवत्तेची पंचसूत्री हा प्रकल्प राबविला जात आहे. या विविध उपक्रमांमुळे महानगरपालिकेची प्राथमिक शाळा सिल्क मिल कॉलनी या शाळेची PM Shri स्कूल म्हणून भारत सरकारने निवड केली. मनपा के प्रा शा नारेगाव आणि मनपा के प्रा शा बनेवाडी या दोन शाळेची निवड राज्य शासनाने डॉ.बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा म्हणून निवडल्या आहेत आणि आता नुकतेच राज्य शासनाने राबविलेल्या मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या उपक्रमात मनपाची मनपा के.प्रा.शा. किराडपुरा नंबर एक या शाळेला जिल्ह्यामध्ये मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा म्हणून पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या उपक्रमात यशस्वी होण्यासाठी किराडपूरा केंद्रीय शाळेच्या मुख्याध्यापिका रईसा बेगम अय्युब खान ,आणि शाळेतील सर्व शिक्षकांनी मेहनत घेतली आहे त्या मुळे त्यांचे मनपा प्रशासनाकडून अभिनंदन करण्यात आले आहे. यावरून असे दिसत आहे की महानगरपालिकेच्या शाळा खरोखर आता स्मार्ट स्कूल टू बेस्ट स्कूल होताना दिसत आहेत. आयुक्त तथा प्रशासकांनी मनपा शाळेतील विद्यार्थी कोठेही कमी पडू नयेत त्या साठी हाती घेतलेल्या सर्व उपक्रम शाळेत राबविण्यासाठी महानगरपालिकेचे अंकुश पांढरे,उप आयुक्त तथा शिक्षण विभाग प्रमुख,गणेश दांडगे नियंत्रण अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली भारत तींनगोटे शिक्षणाधिकारी, रामनाथ थोरे शिक्षण विस्तार आधिकारी, ज्ञानदेव सांगळे सहाय्यक कार्यक्रम आधिकारी व सर्व मुख्याध्यापक , शिक्षक बालताई परिश्रम घेत आहेत.

1.
What's Your Reaction?






