प्रजासत्ताक दिनानिमित्त ए.एफ.के.जी इंग्लिश स्कूलमध्ये ध्वजरोहण व बक्षीस वितरण सोहळा
खुलताबाद : (२६ जानेवारी २०२५) आज दि २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त शहरातील अपॉस्टोलिक फेथ किड्स गार्डन इंग्लिश हायस्कुल येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. माजी नगराध्यक्ष एड. कैसरोद्दीन यांच्या हस्ते सकाळी ८:४५ वाजता ध्वजरोहण करण्यात आले. राष्ट्रगीताने वातावरणात देशभक्तीची भावना जागवली.
याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादी अजीत गटाचे विपिन बारगळ,माजी नगरसेवक परसराम बारगळ,एडीएन न्यूज़ चँनलचे तालुका प्रतिनिधी हुसैन पटेल, लंडन बीबीसी चँनलचे प्रतिनिधी सायमन पेटॉन,खुलताबादच्या पहिल्या महिला पत्रकार सविता पोळके, दर्गा कमिटीचे अध्यक्ष शरफोद्दीन मोहम्मद रमजानी,शब्बीर अहेमद,जायंट्स ग्रुपचे संदेश केरे,नामदेवराव शेळके,तबरेज पठाण,अशोक बारगळ आदि उपस्थित होते. याप्रसंगी शाळेचे अध्यक्ष अजय चिमणे यांच्या हस्ते सर्व मान्यवरांचे सत्कार करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थ्यांच्या भाषणाने झाली त्यांनी देशभक्तिपर घोषवाक्ये दिली तसेच देशभक्तिपर नृत्य सादर करून मुलींनी सर्वांची मने जिंकली.या विशेष प्रसंगी विद्यार्थ्यांना त्यांच्या क्रीडा क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरी केल्या बद्दल त्यांना मान्यवरांच्या हस्ते पदक देऊन गौरविण्यात आले. तसेच स्व.सौ.सविता चिमणे फाउंडेशनतर्फे आयोजित आंतरशालेय सुंदर हस्ताक्षर आणी निबंध लेखन स्पर्धेतील विविध शाळांतील विजेत्यांना रोख रकमेसह प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात आले.प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी भाषण दिले आणि राष्ट्रसेवेसाठी नेहमी तत्पर राहण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेच्या सचिव राजश्री चिमणे, मुख्याध्यापक शहजान तांबोळी,नितिन बारगळ,ज्योती केरे, उज्वला केरे, संगीता नागे, उज्वला राजपुत, पल्लवी घोडके, वैशाली शिंदे, कांचन खत्री,दिशा पवार आणि विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले. उपस्थित पालकांनी कार्यक्रमाचे भरभरून कौतुक केले.
What's Your Reaction?






