गंगापुर खुलताबाद मतदारसंघात प्रचारासोबतच खर्चातही प्रशांत बंब यांची मुसंडी कायम,

गंगापुर खुलताबाद मतदारसंघात प्रचारासोबतच खर्चातही प्रशांत बंब यांची मुसंडी कायम, चौथ्यांदा निवडून येणार...! खुलताबाद | विधानसभा निवडणुकीत उमेदवारांची खर्चाची मर्यादा ४० लाख रुपये आहे. मतदानाला आता अवघे ४८ तास बाकी असताना गंगापुर विधानसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार तथा विद्यमान आमदार प्रशांत बंब यांनी सर्वाधिक खर्च केला आहे आणि ते प्रचारात देखील पुढेच आहेत विशेष म्हणजे शहरात त्यांचा एकही प्रचार कार्यालय नसताना तेच सर्वाधिक लोकप्रिय ठरत आहे सतीश चव्हाण खर्च आणी प्रचाराच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर आहे या मतदारसंघात अपक्ष उमेदवार देवीदास रतन कसबे सर्वात कमी खर्च करत आहेत, तर वंचित बहुजन आघाडीचे अनिल चंडालिया देखील कमी खर्च करत आहेत. भा.ज.पा. चे उमेदवार प्रशांत बंब स्थानिक उमेदवार असल्यामुळे त्यांना आपल्या मतदारसंघाचे सखोल ज्ञान आहे. कार्यकर्ते आणि समर्थकांचे एक जाळे प्रत्येक गावात पसरलेले आहे. विकासकामांमुळे ते मतदारसंघातील बहुतेक गावांमध्ये नियमितपणे ये-जा करत असतात, ज्यामुळे त्यांचे प्रचार सभा जोरदार होत आहेत. गंगापुर शहर आणी खुलताबाद शहरासह तालुक्यातील प्रमुख गावांत त्यांची सभा गाजत आहे विशेष म्हणजे त्यांच्या सभेत नागरिकांची प्रचंड संख्या बघून बंब आता चौथ्यांदा निवडून येतील कि काय अशी धाकधुक आता विरोधकांच्या मनात उतपन्न झाली आहे.अनेक लोक गावांपेक्षा वस्त्यांमध्ये राहतात, आणि बंब त्या वस्त्यांमध्ये जाऊन शेतकरी आणि ग्रामीणांसोबत संवाद साधत आहेत. विकासाच्या नावावर बंब मतदारांकडून मतं मागताना दिसत आहे. मात्र आता कोण बाजी मरणार कि कोणाची वर्णी लागणार याचा निर्णय मतदाता २० नोव्हेंबर रोजी करणार असून आता प्रचारसत्र थंडावला आहे.

Nov 19, 2024 - 05:27
 0

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow