बैजू पाटील जागतिक छायाचित्र स्पर्धेत सर्वप्रथम बैजू यांच्या "जम्बो फ्रेम"ला इंडोनेशियाचा पहिला पुरस्कार
बैजू पाटील जागतिक छायाचित्र स्पर्धेत सर्वप्रथम बैजू यांच्या "जम्बो फ्रेम"ला इंडोनेशियाचा पहिला पुरस्कार हे स्पर्धा 20 देशांमध्ये आयोजित केली जाते दरवर्षी वेगवेगळ्या देशात मागच्या वर्षी लंडन येथे झाली यावर्षी इंडोनेशिया येथे आयोजित केली आहे 31 देशातील 65 हजार छायाचित्रातून जिम कार्बेटमधील हत्तींचा फोटो ठरला सर्वप्रथम औरंगाबाद (प्रतिनिधी) - मागील 38 वर्षांपासून वन्यजीव छायाचित्रणात उल्लेखनीय कामगिरीचा दबदबा निर्माण करणाऱ्या प्रसिद्ध वाइल्डलाइफ फोटोग्राफर बैजू पाटील यांनी महाराष्ट्रासह देशाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे. पाटील यांना इंडोनेशियाचा क्रोमॅटीक फोटोग्राफी- 2024 हा पुरस्कार जाहीर झाला आहे.31 देशातील छायाचित्रकारांच्या 65 हजार छायाचित्रांमधून बैजू यांच्या जीम कार्बेट राष्ट्रीय उद्यानातील हत्तींचा फोटो अव्वल ठरला. जगविख्यात छायाचित्रकार बैजू पाटील यांना इंडोनेशियातील मानाचा पुरस्कार मिळाल्यामुळे या क्षेत्रातील परदेशी छायाचित्रकारांची मक्तेदारी पुन्हा एकदा मोडीत निघाली आहे. केवळ भारतच नव्हे तर जगातील विविध ठिकाणी जाऊन बैजू यांनी वाईल्ड लाईफ फोटोग्राफी केली आहे. वन्य प्राणी व पक्षी यांचे फोटो काढताना त्यांनी वन्यजीवांमध्ये राहून त्यांचे मुक्त छंद जगणे त्यांनी कॅमेऱ्यात कैद केले आहे. असा आहे पुरस्कार प्राप्त फोटो अतिशय कलात्मक व अत्याधुनिक कॅमेऱ्याने स्वतःचे कौशल्य व अनुभव वापरून हत्तींचा असा फोटो पहिल्यांदाच काढण्यात आला आहे.जीम कार्बेट राष्ट्रीय उद्यान हत्ती व वाघांसाठी प्रसिद्ध आहे. इतर प्राणीही येथे मोठ्या प्रमाणात दिसतात. कलात्मक असा फोटो घेण्यासाठी बैजू पाटील जेव्हा जीम कार्बेटमध्ये भ्रमंती करत होते तेव्हा हत्तींचा कळप त्यांना दिसला. त्या क्षणी त्यांच्या बाजूने मोठा हत्ती जात होता. त्या हत्तीच्या पायातून समोरील कळपाची फ्रेम त्यांनी टिपली. परंतु ही फ्रेम टिपण्यासाठी बैजू यांना प्रचंड मेहनत करावी लागली. कारण हत्तीची फोटोग्राफी करणे अतिशय अवघड काम असते कारण ते कुठल्याही क्षणी अग्रेसिव्ह होऊ शकतात. कुठल्याही माणसाला ते जवळ येऊ देत नाहीत. पण याचा धोका पत्करून बैजू यांनी ही जम्बो फ्रेम घेतली. तीन-चार वर्षे आधी बैजू पाटील यांच्यावर हत्तीने देखील अटॅक केला होता. या हल्ल्यात बैजू थोडक्यात बचावले होते. मे आणि जूनमध्ये रामगंगा नदी ही आटू लागते. आणि नदी आटल्यानंतर आजूबाजूला बऱ्याच प्रमाणात गवत हिरवगार तयार होते आणि ते गवत खाण्यासाठीच तिथे झुंज कळपच्या कळप हत्ती येतात गवत खाण्यासाठी या फोटोचे वैशिष्ट्य म्हणजे अतिशय छोटा लेन्स आणि अतिशय जवळ जाऊन हा फोटो काढल्यामुळे ह्या छायाचित्र खूप प्रसिद्धी मिळवली. 40 पेक्षा जास्त राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. दरवेळेस ते काहीतरी वेगळं इतिहास घडवून भारताचे नाव पूर्ण जगामध्ये उमटवण्याच्या प्रयत्न करत असतात. भारतातील वन्यजीव हे अतिशय समृद्ध आहेत व अतिशय लाजाळू आहेत. भारतात फोटोग्राफी करणं खूप जास्त चॅलेंजिंग आणि अवघड आहे या कारणामुळेच बैजू पाटील हे जगभरात प्रसिद्ध झालेले आहेत. बैजू पाटील नामांकित विद्यापीठ एमजीएम यांचे फोटोग्राफी विभागाचे प्रमुख आहे व त्यांनी अनेक छायाचित्र कार घडवत आहेत व घडविले आहेत बैजू पाटील या स्पर्धेसाठी मागील चार ते पाच वर्षापासून विजेत्या होण्याचा प्रयत्न करत होते. पण यावर्षी त्यांना यश मिळाले. जागतिक स्तरावर पहिले पारितोषिक मिळवणे खूप अवघड आहे त्यामुळे बैजू पाटील यांचे सर्वत्र खूप कौतुक होत आहे
1.
What's Your Reaction?






